Shankarpali recipe| शंकरपाळे कसे करायचे? खारे-गोडे दोन्ही… वाचा Combo!

खुसखुशीत, तोंडात टाकले की विरघळणारे गोड आणि खारे शंकरपाळे कसे करावेत, वाचा सोपी रेसिपी

Shankarpali recipe| शंकरपाळे कसे करायचे? खारे-गोडे दोन्ही... वाचा Combo!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 11:06 AM

दिवाळी (Diwali) तोंडावर आणि चकली-शंकरपाळ्यांचा (Shankarpali recipe) खमंग गंध घराघरात दरवळावा… सध्या वातावरण पावसाळी असलं तरीही उत्सवप्रिय माणसांना फार फरक पडत नाही. आकाराने छोटे, चालता-फिरता चटकन तोंडात टाकता येणारे शंकरपाळे (Shankarpale) कसे करायचे, हे आपण आता पाहुयात. हल्ली हेल्थ कॉन्शियस लोकांचा वर्ग वाढतोय. त्यामुळे खारे आणि गोडे दोन्ही प्रकारचे शंकरपाळे कसे करायचे ते पाहुयात….

गोडे शंकरपाळे- सोपी रेसिपी

साहित्य- अर्धा कप दूध, अर्धा कप तूप आणि ३ पाव कप पिठी साखर, 3 कप मैदा

कृती-

  • एका भांड्यात तूप, पिठी साखर आणि दूध घ्यावं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं..
  • आता भांड्यातील हे मिश्रण गॅसवर ठेवावे. मंद आचेवर, फक्त साखर वितळेपर्यंत गरम करावे.

टीप- या मिश्रणाला उकळी अजिबात येऊ देऊ नये.

  •  तूप-साखर-दुधाचं मिश्रण जेवढं आहे, तेवढंच मैद्याचं पीठ घालायचं. आपण घेतलेल्या मिश्रणानुसार साधारण 3 कप मैदा पुरेल.
  • या पिठाचा गोळा करून घ्यावा. खूप घट्ट किंवा पातळ करू नये. मध्यम प्रमाणात भिजवावा.
  • शंकरपाळ्याचा हा गोळा एक तासभर झाकून ठेवावा.
  • तासाभरानंतर पोळीसाठी जसा घेतो, तसा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावा

टीपपोळीच्या कणकीसारखा हा गोळा एकजीव होत नाही. पोळी लाटताना या गोळ्याला बाहेरून भेगा पडलेल्या दिसतात. हे नॉर्मल आहे.

  •  आपल्याला हव्या तशा शंकरपाळ्या जाड किंवा पातळ लाटून घ्याव्यात.
  •  छान आकारात हव्या असतील तर या पोळीच्या आधी कडा काढून घ्याव्यात. त्यानंतर आडवे-उभे-तिरपे काप देऊन शंकरपाळे करावेत.

टीपसगळे शंकरपाळे बनवेपर्यंत कापलेले शंकरपाळे एका ताटाखाली झाकून ठेवावेत.

  •  कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. तेल खूप कडकडीत गरम करू नये.
  •  मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घ्यावेत.
  •  सगळ्या बाजूने तांबूस रंग येईपर्यंत हलवत रहावे.
  •  तांबूस रंग आल्यानंतर कढईतून बाजूला काढून टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.
  •  हे शंकरपाळे दोन ते तीन आठवडे चांगले राहतात.

जिरा शंकरपाळे

साहित्य– 1 कप मैदा,1 मोठा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ

कृती

  •  मैदा, जिरे आणि मीठ एका ताटात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  •  या मिश्रणात एक मोठा चमचा तेल घालावं. थंड किंवा गरम दोन्ही घातलं तरी चालतं.
  •  तेल मैद्यात छान झिरपल्यानंतर थोड-थोडं पाणी घालून गोळा भिजवून घ्यावा.
  •  एका बाऊलमध्ये हा गोळा साधारण अर्धा तास झाकून ठेवावा.
  •  शंकरपाळे लाटताना एकदा हा गोळा पुन्हा छानसा मळून घ्यावा.
  •  शंकरपाळ्यासाठी शक्य तेवढी पातळ पोळी लाटून घ्यावी.
  •  कटरच्या सहाय्याने हव्या त्या आकारात किंवा डायमंड आकारात हे शंकरपाळे कापून घ्यायचे.
  •  सगळे शंकरपाळे लाटून, कापून होईपर्यंत एका ताटात हे झाकून ठेवावेत.
  •  कढईत तेल गरम झाल्यावर झाऱ्यावर काही शंकरपाळे घेऊन ते तेलात सोडावेत.
  •  पुऱ्यांसारखे हे शंकरपाळे फुगतात. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्यावेत.
  •  सोनेरी रंग आल्यावर शंकरपाळे टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.