Chakli Recipe | चक चक चकली, चुकायला नको…. वाचा परफेक्ट रेसिपी!

दिवाळीसाठी खमंग खुसखुशीत न चुकलेली झक्कास चकली करायची असेल तर ही अगदी साधी रेसिपी अवश्य करून पहा...

Chakli Recipe | चक चक चकली, चुकायला नको.... वाचा परफेक्ट रेसिपी!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 10:40 AM

दिवाळीचा (Diwali) फराळ करण्याची वेळ झाली आहे. हवामान बदलामुळे सध्या पावसाचं वातावरण असलं तरीही दिवाळसणाला खमंग, खुसखुशीत चकलीची (Chakli) आठवण सगळ्यांनाच येते. चकलीची भाजणी (Chakali Bhajani) आणि कधीही बिघडणार नाही, अशी चकली करायची असेल तर ही कृती नक्की फॉलो करा. आधी चकलीची भाजणी कशी करायची ते पाहुयात आणि त्यानंतर त्याच भाजणीपासून चकली कशी करायची (Chakli recipe) तेही पाहुयात…

चकलीची भाजणी कशी करायची?

  • सर्वप्रथम एक सूचना. यासाठी वापरायची धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत. – साहित्य- 3 वाट्या साधे तांदूळ, दीड वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ,  1 वाटी पोहे, पाऊण वाटी धणे, 2 टेबल स्पून जिरे
  •  सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजू नयेत. किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा.
  •  हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी.
  •  त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी. साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा.
  •  मग मूगडाळ भाजावी. त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत.
  •  पोहे भाजणं अर्ध्यावर आले असतानाच असतानाच त्यात धणे टाकावेत. थोडावेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावेत.
  •  भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात 2 टेबलस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी.
  •  या भाजणीत  40 ते 50 मध्यम आकाराच्या चकल्या होतील.

Chakali Bhajani

कुरकुरीत चकलीची रेसिपी-

  • 2 वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली करुयात.- एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, अर्धा टेबलस्पून तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, 2 टीस्पून तूप टाकावे.
  •  या पाण्याला उकळी आली की 2 वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी.
  • गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे.
  • त्यानंतर हे 1 तासभर झाकून ठेवावे.
  • तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात तो मऊसर भिजवून घ्यावा.
  • चकली करण्याचं यंत्र म्हणजेच सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं.
  • त्यात हे पीठ टाकावं. मध्यम आकाराच्या चकल्या बटरपेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात.
  •  कढईत तेल घ्यावं. भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्यात चकली तळून घ्यावी.
  •  दोन वाटी मिश्रणात साधारण 15 ते 16 चकल्या होतील.

Chakli

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.