देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं काय कारण आहे?

केरळमध्ये दिवाळी साजरी न होण्यासाठीचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं हवामान. उत्तर भारतात पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यात दिवाळी सण साजरा केला जातो.

देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं काय कारण आहे?
देशातील असं एक राज्य जिथे दिवाळी साजरीच होत नाही; असं का आहे? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 3:56 PM

तिरुवनंतपूरम: देशभरात दिवाळीचा (Diwali 2022) जल्लोष सुरू आहे. सर्वत्र आनंद आणि उत्सवाचं वातावरण आहे. मात्र, देशातील एक असं राज्य आहे की जिथे दिवाळीच साजरी होत नाही. ते राज्य म्हणजे दक्षिण भारतातील (south india) केरळ (Kerala) होय. केरळमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. त्यामागे काही पौराणिक कारणं आहेत. त्यावर टाकलेला हा प्रकाश.

केरळचा राजा आणि असूर महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. केरळमध्ये असूर महाबलीची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाल्याने केरळमध्ये दिवाळी सण साजरा केला जात नाही, अशी एक मान्यता आहे. त्याशिवाय केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याची आणखीही काही कारणं आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक परंपरांच्या बाबतीत उत्तर आणि दक्षिण भारतात फरक आहे. दक्षिण भारतात असूरांबाबत सकारात्मकता आहे. तर उत्तर भारतात असूर हे खलनायक आहेत. रावणावरील प्रभू रामाने मिळवलेला विजय म्हणूनही दिवाळीकडे पाहिलं जातं. त्यामुळेही दक्षिण भारतात दिवाळी साजरी केली जात नाही.

केरळमध्ये दिवाळी साजरी न होण्यासाठीचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं हवामान. उत्तर भारतात पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यात दिवाळी सण साजरा केला जातो. तर केरळमध्ये असं होत नाही. केरळमध्ये हिवाळ्याची सुरुवात होत नाही आणि पावसाळाही संपत नाही. पाऊस होत असल्याने केरळमध्ये ना दिवे लावले जात, ना फटाके फोडले जात. म्हणजेच पाऊस हे सुद्धा दिवाळी साजरी न करण्यामागचं कारण आहे.

उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील हिंदूंच्या मान्यतेमध्येही फरक आहे. जसं की, उत्तर भारतात प्रभू रामचंद्राची पूजा करण्याची पद्धत आहे. पण केरळमध्ये तसं नाही. केरळमध्ये श्रीरामाऐवजी श्रीकृष्णाची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळेही उत्तर भारताप्रमाणे या ठिकाणी दिवाळीचा जल्लोष आणि उत्साह दिसून येत नाही.

दक्षिण भारतात द्रविड संस्कृती मुळापर्यंत रुजलेली आहे. त्यामुळे द्रविड संस्कृतीतील सण उत्सवच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. महाराजा बळीशी संबंधित ओणम हा सण केरळात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.