लाखांच्या असू द्या, ‘या’ 3 गोष्टी दुसऱ्यांच्या घरून आणू नका, नाहीतर…
Vastu Tips: ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपण इतरांच्या घरातून आपल्या घरी आणलेल्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जेचे मोठे कारण बनू शकतात. याचा तुमच्यावर आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक तणावाच्या स्वरूपात परिणाम होऊ शकतो.
Vastu Tips: तुम्ही दुसऱ्यांच्या घरी काही आणता का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपण इतरांच्या घरातून आपल्या घरी आणलेल्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जेचे मोठे कारण बनू शकतात. याचा तुमच्यावर आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक तणावाच्या स्वरूपात परिणाम होऊ शकतो. आम्ही तुम्हाला घाबरवत नाही आहोत. पण, या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
अनेक गोष्टींची देवाणघेवाण आपण अगदी सहज करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वास्तुनुसार काही वस्तू तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. नसेल केला तर ही माहिती नक्की वाचा. कारण, तुमचे नुकसान होऊ शकते.
ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपण इतरांच्या घरातून आपल्या घरी आणलेल्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जेचे मोठे कारण बनू शकतात. याचा तुमच्यावर आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक तणावाच्या स्वरूपात परिणाम होऊ शकतो.
वस्तूचा मालक बदलला की ऊर्जा बदलते
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही वस्तूचा मालक बदलला तर त्यानुसार तिची ऊर्जाही बदलते. त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे टाळा ज्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुसऱ्याच्या वापरलेल्या वस्तू घरात आणल्याने आयुष्यात नकारात्मकता पसरते. तुम्हाला कोणी गिफ्ट दिले तरी खाली नमूद केलेल्या तीन गोष्टी स्वीकारू नका.
जुने फर्निचर घरी आणू नका
तुम्ही कधी एखाद्याच्या घरातून जुने फर्निचर किंवा इतर वस्तू आणल्या असतील तर यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तसेच दारिद्र्य आणि वास्तुदोष येतील. घरात गरिबी पसरू नये म्हणून इतरांच्या घरातील कोणतेही फर्निचर आपल्या घरात आणणे टाळावे.
दुसऱ्याची चप्पल घालणे टाळा
एखाद्याच्या घरून आणलेली चप्पल घालू नये, दुसऱ्याची चप्पल घातल्यानेही नकारात्मकता पसरते. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या आतील नकारात्मक ऊर्जा प्रथम त्याच्या पायातून बाहेर पडते, त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्याची चप्पल घातली तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या आतही प्रवेश करू शकते
दुसऱ्यांची छत्री वापरू नका
दुसऱ्याच्या घरातील छत्री वापरणे टाळावे. ज्योतिषशास्त्रानुसार दुसऱ्याची छत्री वापरल्याने ग्रहांची हालचाल उलटते, ज्यामुळे नकारात्मकता पसरते. जर काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्याची छत्री वापरत असाल तर ते घेऊन घरात प्रवेश करू नका आणि बाहेरून परत करा. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा अबाधित राखू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)