Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही या गोष्टी करू नका…
नवरात्र (Chaitra Navratri) हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. या दरम्यान लोक 9 दिवस देवी दुर्गेची पूजा करतात. नऊ प्रकारची उपासना करून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक दिनदर्शिकेनुसार नवरात्र वर्षातून चार वेळा येते, ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्र मार्च-एप्रिल दरम्यान येते तर शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर (October) दरम्यान असते.
मुंबई : नवरात्र (Chaitra Navratri) हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. या दरम्यान लोक 9 दिवस देवी दुर्गेची पूजा करतात. नऊ प्रकारची उपासना करून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक दिनदर्शिकेनुसार नवरात्र वर्षातून चार वेळा येते, ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्र मार्च-एप्रिल दरम्यान येते तर शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर (October) दरम्यान असते. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चा केल्याने कृपा भक्तांवर कायम राहते, असे म्हटले जाते. नऊ रूपांना प्रसन्न (Pleased) करण्यासाठी अनेकजण यावेळी उपवासही करतात.
नवरात्रीमध्ये चूकूनही या गोष्टी करू नका!
-नवरात्रीमध्ये लोक भक्तीभावाने देवाची पूजा आणि उपवास करतात. मात्र, याचदरम्यान त्यांच्या हातातून अशा काही चुका होतात की, त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर पाणीच फिरते. धार्मिक मान्यतांनुसार अशा कृतींमुळे घरात दारिद्र्य आणि कलह निर्माण होऊ शकतो. यागोष्टी नेमक्या कोणत्या याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
-हिंदू धर्मात दान हे पवित्र कार्य मानले जाते. यामुळेच दान धर्म करताना अजिबात विचार करू नका. देणगी देण्यास कधीही मागे हटू नका. नवरात्रीच्या काळात घरी आलेल्या साधूला रिकाम्या हाताने परत कधीही जाऊ देऊ नका. काही लोक दान देण्याचे टाळतात आणि ते घरी आलेल्या साधूला हाकलून देतात. असे म्हटले जाते की यामुळे दुर्गा देवी नाराज होऊ शकते.
-असे मानले जाते की कधी कधी भिक्षूंच्या रूपातील देवही तुमच्या घरी येऊ शकतात. नवरात्रीमध्ये चमड्याच्या वस्तू जसे की बेल्ट, पर्स, शूज आणि जॅकेट वापरू नयेत. चमडे प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते आणि त्यामुळे नवरात्रीच्या काळात ते घालणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी तुम्ही इतर पर्याय वापरू शकता. मात्र, काही लोक हे माहीत असूनही त्यांचा वापर करण्याची चूक करतात. शक्यतो नवरात्रीमध्ये चमड्यांच्या वस्तूंची खरेदी ही करू नका.
संबंधित बातम्या :
03 April 2022 Panchang | 03 एप्रिल 2022, रविवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
Ramadan | रमजानचे रोजे करताय? मग मधुमेह असणाऱ्यांनी या ‘टीप्स्’ लक्षात ठेवा