मुंबई : देवी श्री लक्ष्मी, ज्या श्री हरीच्या पत्नी आहे. जगाचे उद्धारकर्ता आणि संपत्ती आणि सुख देणारी आहे. असे मानले जाते की, व्यक्तीला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनात संपत्ती, समृद्धी, सन्मान, कीर्ती इत्यादींची कमतरता नसते. पण, ज्यावर देवी लक्ष्मी रागावते त्याला राजापासून रंक बनवते.
जर, तुम्हालाही वाटत असेल की देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावली आहे, तर तिला प्रसन्न करण्यासाठी, घरात शंख आणा आणि पूजास्थळी विधीवत स्थापित करा आणि शंखाची नियमित पूजा करा. असे म्हटले जाते की शंख देवी लक्ष्मी आणि नारायण दोघांनाही प्रिय आहे. ज्या घरात शंख आहे, त्या घरात देवी लक्ष्मी आणि नारायण दोघेही राहतात. या व्यतिरिक्त, शंखा संबंधित काही उपाय देखील तुमच्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
व्यवसायाच्या वाढीसाठी
शिवलिंग आणि शालिग्राम प्रमाणे शंखांचे अनेक प्रकार आहेत. दक्षिणावर्ती शंख अत्यंत उत्तम मानला जातो. असे म्हटले जाते की जर दक्षिणावर्ती शंख भगवान विष्णूच्या चित्राखाली आपल्या व्यावसायिक ठिकाणी ठेवले असेल तर व्यवसायात भरपूर नफा होतो आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात. जर गंगेचे पाण्याने शंख भरून कामाच्या ठिकाणी शिंपडले गेले तर व्यवसाय आणि नोकरीतले अडथळे दूर होतात.
घरातील त्रास दूर करण्यासाठी
जर घरात काही त्रास होत असतील तर तुळशीच्या साहाय्याने शंखाची पूजा करा. हे सर्व दुःख, दारिद्र्य आणि दुःख दूर करते. देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात राहतात आणि घराच्या सर्व समस्या दूर करतात.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी
जर घरात नियमितपणे शंख वाजवला तर घरातील नकारात्मकता दूर होते. शंखांचा आवाज खूप शुभ मानला जातो. पण, हे लक्षात ठेवा की पूजा आणि फुंकण्यासाठी वापरलेले शंख वेगळेवेगळे असले पाहिजेत.
पती-पत्नीमधील संबंध सुधारण्यासाठी
जर पती-पत्नीमधील नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ लागला असेल, तर मोत्याच्या शंखाला पारदर्शक काचेच्या भांड्यात ठेवा. यामुळे, दोघांमधील संबंध सुधारु लागतात आणि दोघे एकमेकांना आधार देऊ लागतात.
Good luck tips for money : देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास हे महाउपाय करा, धनलाभ होईलhttps://t.co/it6vhdb0I5#TipsForMoney #Mahaupay #GoddessLakshami
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
कुंडलीत बृहस्पतिला बळ देतील हे ज्योतिष उपाय, जाणून घ्या गुरुवारी काय करावे, काय करू नये!