Garuda Purana | आयुष्यात यश मिळवायचं असेल तर गरुड पुराणातील ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी (Garuda Purana) एक मानले जाते. भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे प्रमुख देवता आहेत. म्हणूनच, हे महापुराण लोकांना विष्णूची भक्ती करण्याचा मार्ग दाखवते. या महापुराणात माणसाला सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मृत्यूनंतर, कर्मानुसार फळ मिळविण्याविषयी सांगितले गेले आहे. गरुड पुराणात यमलोक, स्वर्ग आणि नरकाचा उल्लेख आहे.

Garuda Purana | आयुष्यात यश मिळवायचं असेल तर गरुड पुराणातील 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
गरुड पुराणात सांगितले आहे की, व्यक्तीची इच्छा असेल तर सकारात्मक विचार आणि सतत सराव केला तर अशक्यही शक्य होते. हे त्याच्या मेहनतीवर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे निराश होऊ नका आणि कठोर परिश्रम करा आणि स्वतःचे भाग्य स्वतःच लिहा.
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 2:23 PM

मुंबई : गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी (Garuda Purana) एक मानले जाते. भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे प्रमुख देवता आहेत. म्हणूनच, हे महापुराण लोकांना विष्णूची भक्ती करण्याचा मार्ग दाखवते. या महापुराणात माणसाला सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मृत्यूनंतर, कर्मानुसार फळ मिळविण्याविषयी सांगितले गेले आहे. गरुड पुराणात यमलोक, स्वर्ग आणि नरकाचा उल्लेख आहे (Do These Four Things Mentioned In Garuda Purana To Get Success).

याचा अर्थ लोकांना घाबरविणे नाही, परंतु त्यांना समजवण्याचा मार्ग आहे की त्यांनी आयुष्यात चांगले कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरुन त्यांना मरणानंतर मोक्ष मिळेल. यासाठी जीवन जगण्यासाठी सर्व धोरणे गरुड पुराणातील नितार अध्यायात सांगितली गेली आहेत.

जर एखादी व्यक्ती या गोष्टींचे अनुसरण करत असेल तर एखाद्याला जीवनातल्या अनेक मोठ्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. गरुड पुराणात म्हटल्या गेलेल्या अशा चार गोष्टींबद्दल जाणून घ्या, ज्याचे अनुसरण केल्याने एखादी व्यक्ती आपल्या जीवनात अपार यश मिळवू शकते.

भगवान विष्णूची पूजा

भगवान विष्णू जगाचे पालनहार म्हणून ओळखले जातात. कारण, ते जगाचे रक्षणकर्ते आहेत. गरुड पुराणानुसार, जी व्यक्ती विष्णूचे नाव घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतो, त्याच्या आयुष्यातील दुर्दैव दूर होते आणि त्याला जीवनात अपार यश मिळते. दुःख त्याच्या आयुष्यात येते आणि निघून जाते. अशा व्यक्तीवर भगवान नारायणची कृपा कायम असते.

तुळस

तुळशीचे रोप नारायणांना खूप प्रिय आहे. म्हणूनच प्रत्येक घरात तुळस असणे आवश्यक आहे. रोज तुळशीची पाने नारायणांना अर्पण करा आणि प्रसाद स्वरुपात त्याचं सेवन करा. यामुळे, व्यक्ती सर्व दुःख आणि रोगांपासून वाचते. रोज संध्याकाळी तुळशीसमोर तूपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तू दोष संपतात आणि कुटुंबातील समस्या दूर होतात.

एकादशी व्रत

वर्षात एकूण 24 एकादशी व्रत येतात. हे सर्व नारायणांना समर्पित असतात आणि त्यांना मोक्ष देतात, अशी मान्यता आहे. मान्यता आहे की, जी व्यक्ती विधीवत एकादशी व्रत ठेवते, त्याच्या आधीच्या जन्माची पापे देखील नष्ट होतात आणि त्याच्या आयुष्यात सौभाग्य येतं. यश मिळवल्यानंतर ती व्यक्ती मोक्ष प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करते.

गंगाजल

गरुड पुराणातही गंगाजलचे महत्त्व सांगितले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात गंगाजल ठेवले पाहिजे. वेळोवेळी गंगा स्नान करावे आणि हे पवित्र जल पूजेमध्ये वापरावे. कलियुगात गंगेला मोक्ष देणारी नदी मानले जाते.

Do These Four Things Mentioned In Garuda Purana To Get Success

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.