Vaishakh Month | दु:ख-दारिद्र्य दूर करायचं असेल तर वैशाख महिन्यात हे उपाय करा, महादेवाची कृपा राहील

वैशाख महिना 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month) जो 26 मे 2021 रोजी संपेल. हा महिना धार्मिक दृष्टीने खूप विशेष मानला जातो. हा महिना दान आणि पूजा करण्याचा महिना आहे. यादरम्यान भगवान नारायण व्यतिरिक्त महादेवाची उपासना करण्याचा नियमही आहे.

Vaishakh Month | दु:ख-दारिद्र्य दूर करायचं असेल तर वैशाख महिन्यात हे उपाय करा, महादेवाची कृपा राहील
mahadev
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 3:31 PM

मुंबई : वैशाख महिना 28 एप्रिलपासून सुरु झाला आहे (Vaishakh Month) जो 26 मे 2021 रोजी संपेल. हा महिना धार्मिक दृष्टीने खूप विशेष मानला जातो. हा महिना दान आणि पूजा करण्याचा महिना आहे. यादरम्यान भगवान नारायण व्यतिरिक्त महादेवाची उपासना करण्याचा नियमही आहे. असे मानले जाते की या महिन्यात दररोज सकाळी भगवान शिव यांची पूजा आणि काही उपाय केले तर जीवनातील मोठे दुःख आणि आपत्ती दूर होतात. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया (Do These Upay During Vaishakh Month To Get Rid Of Financial Crisis And Other Problems)-

1. कोरोना कालावधीत, लोक घरोघरी आजारांशी लढत आहेत. जर तुमच्या घरातही आजरपण असेल तर या वैशाख महिन्यात दुधामध्ये काळी तीळ घाला आणि शिवलिंगावर अर्पण करा. चमत्कारिक परिणाम दिसतील.

2. जर तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर बेलाच्या पानावर चंदनाने श्रीराम किंवा ओम नमः शिवाय लिहा आणि याची माळ बनवून शिवलिंगावर अर्पण करा. त्यानंतर संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करा.

3. कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी वैशाख महिन्यात आकच्या फुलांची माळ घालून महादेवाला अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. तुमचे काम सिद्ध होईल.

4. घरात सुख-समृद्धी हवी असेल तर दररोज महादेवाला संपूर्ण तांदूळ अर्पण करा आणि थोडे तांदूळ दान करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.

5. जर विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या उद्भवली असेल तर पाण्यामध्ये केशर घाला आणि शिवलिंगाला अर्पण करा. याशिवाय वैवाहिक महिलेला श्रृंगाराचे सामान दान करा.

6. जर तुमचे नशीब तुम्हाला सोबत देत नसेल तर संपूर्ण वैशाख महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि यादरम्यान शिवलिंगाला आपल्या तळहातावर घासून महादेवाची सेवा करा. यामुळे आपले नशीब चमकेल.

7. घर आणि मुलांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी महादेवला धतुरा अर्पण करा. याशिवाय गरजूंना सत्तू आणि धान्य दान करा.

8. जर तुम्हाला जीवनात सर्व सुखसोयी मिळवायच्या असतील, तर द्राक्षाच्या झाडाखाली उभे राहून तूप आणि खीरिचं दान करा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर राहील आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतील.

9. वैशाख महिन्यात दररोज शिवलिंग आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा. यामुळे संपूर्ण शिव कुटुंबाची तुमच्या घरावर कृपा होते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.

Do These Upay During Vaishakh Month To Get Rid Of Financial Crisis And Other Problems

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Vaishakh 2021 : वैशाख महिन्याला आजपासून सुरुवात, ब्रम्हाजींनुसार हा सर्वश्रेष्ठ महिना, जाणून घ्या याबाबत आणखी माहिती…

Vaishakh Month | वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.