Shree Ganesha | रखडलेली कामं पूर्ण होतील, घरात भरभराट येईल, बुधवारी ‘हे’ उपाय करा…
हिंदू धर्मग्रंथांमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो (Lord Shree Ganesha). बुधवारचा दिवस हा बुद्धीदाता आणि प्रथमपूज्य गणपतीला समर्पित असतो. गणपतीला शुभतेचे प्रतीक मानले जाते. मान्यता आहे की, गणपतीचे पूजन केल्याने घरात शुभता येते आणि सर्व रखडलेली काम पूर्ण होतात
मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो (Lord Shree Ganesha). बुधवारचा दिवस हा बुद्धीदाता आणि प्रथमपूज्य गणपतीला समर्पित असतो. गणपतीला शुभतेचे प्रतीक मानले जाते. मान्यता आहे की, गणपतीचे पूजन केल्याने घरात शुभता येते आणि सर्व रखडलेली काम पूर्ण होतात (Do These Upay On Wednesday For Health Wealth And All Your Problems).
जर तुमच्या कुंडलीत बुध कमकुवत असेल तर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा करावी. यामुळे बुधशी संबंधित समस्या दूर होतात. जेव्हा बुध कमकुवत होतो तेव्हा व्यक्तीची वास घेण्याची क्षमता कमकुवत होते, त्वचेशी संबंधित आणि अंतर्गत रोग, गुप्त रोग होण्याची शक्यता असते. निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते आणि व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नुकसान होऊ शकते. बुधचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी बुधवारी काही विशेष उपाय करणे प्रभावी ठरु शकतात. त्या उपायांबद्दल जाणून घेऊया –
? रखडलेली काम पूर्ण होण्यासाठी
जर आपले कोणतेही काम गेल्या बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर बुधवारी आपल्या खिशात हिरवा रुमाल ठेवा आणि बडीशेप खाऊन घरातून निघा. बुधवारी हिरव्या रंगाचा वापर शुभ मानला जातो. याने प्रलंबित काम देखील पूर्ण होतील.
? संपत्तीचा अभाव दूर करण्यासाठी
बुधवारी किन्नरांना काही पैसे द्या आणि त्यांच्याकडून एक नाणे परत घ्या. ते नाणे पूजेच्या ठिकाणी ठेवून धूप दाखवा. यानंतर, ते नाणे हिरव्या कपड्यात ठेवून ते तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही.
? बुधची अशुभ स्थिती समाप्त करण्यासाठी
प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पित करा आणि गूळ आणि धन्याचं नैवेद्य द्या. आपण त्यांचा आवडता पदार्थ मोदक किंवा लाडू देखील त्यांना अर्पण करु शकता. यानंतर “ओम ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:” या मंत्राचा जप करा आणि आपल्या व्यथा दूर करण्यासाठी देवाला प्रार्थना करा. नंतर कोथिंबीर, मूग, हिरव्या भाज्या इत्यादी कोणत्याही गरजूला दान करा. काही बुधवार सतत असे केल्याने आपल्याला परिस्थितीत बदल दिसू लागेल.
? देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी
प्रत्येक बुधवारी गणपतीला आठ आकची फुले अर्पण करा. महादेवाबरोबरच आकची फुले गणपतीलाही प्रिय आहेत. ते अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि घरात शुभतेसह देवी लक्ष्मीही निवास करते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबात भरभराट होते.
? बुध संबंधित आजारांपासून सुटका होण्यासाठी
बुध संबंधित कोणत्याही आजारापासून मुक्त होण्यासाठी तांब्याच्या पात्रात दररोज पाणी भरावे आणि ते लाकडाच्या टेबलावर ठेवावे. हे पाणी दररोज प्यावे. याशिवाय तांब्याची भांडी दान करावी. यासह बुध संबंधित सर्व रोग दूर होतात.
Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधीhttps://t.co/VTxcIwggvH#VinayakChaturthi2021 #LordGanesha #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
Do These Upay On Wednesday For Health Wealth And All Your Problems
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Bhaum Pradosh Vrat 2021 | महादेव आणि हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आज ‘हे’ उपाय करा
Bhaum Pradosh Vrat 2021 | भौम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी
Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील