मुंबई : Goddess Lakshmi : देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी. तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात.
रात्रंदिवस मेहनत करुनही लक्ष्मी देवतेची कृपा काही लोकांवरच बरसते. जर तुमच्यावरही ल्क्षमी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर हे पाच उपाय करा. यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धन-धान्याचा वर्षाव होईल.
कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा –
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते.
शुक्रवारचे विशेष महत्त्व –
शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करुन श्रीयंत्राची पूजा करावी. शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
या प्रकारे करा जप –
धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा. हे खूप प्रभावी मानले जाते. या उपायाने मातेची कृपा भक्तावर लवकर होते.
या वस्तूंचे दान करा –
शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा. त्यात शंख, कमळाचे फूल, कवडी इत्यादी हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
देवीच्या पूजेसाठी दिशेची काळजी घ्या –
जर तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरुपी वास करु इच्छित असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजास्थानाची विशेष काळजी घ्यावी लागेल. घराचे पूजेचे स्थान ईशान्य दिशेला असावे आणि पूर्व दिशेला तोंड करुन पूजा करावी.
Shri Ram Raksha Stotra : जीवनातील प्रत्येक आपत्ती, दु:खातून वाचवतो श्री राम रक्षा स्तोत्र, जाणून घ्या याचा उपायhttps://t.co/gJEe3zRSnv#ShriRam #ShriRamRakshaStotra #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा…
नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेल