तुम्हीही बाथरूमध्ये मोकळी बादली ठेवता? जाणून घ्या वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते.अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या बाथरूममध्ये खाली बादली ठेवली तर तीथे नकारात्मक ऊर्जा आणखी वाढते, त्यामुळे बादली नेहमी पाण्यानं भरलेली असावी.

हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना असल्यास शुभ मानले जाते. घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहाते, सुख समृद्धी येते. आपण घर बांधताना त्याची रचना जशी वास्तुशास्त्रानुसार करतो. तसेचं घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. आपण आपलं स्वयंपाक घर, देवघर आणि बेडरूम यांची सजावट करताना वास्तुशास्त्र आणि दिशाचा विचार करतो. मात्र घरात अशी देखील एक जागा असते, जिथे सतत नकारात्मक ऊर्जा असते, ते म्हणजे तुमचं बाथरूम, काही छोट्या-छोट्या चुकांमुळे देखील तुमच्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं. कुटुंबात वाद विवाद होऊ शकतात. आर्थिक संकट जाणवू शकतं.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते.अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या बाथरूममध्ये खाली बादली ठेवली तर तीथे नकारात्मक ऊर्जा आणखी वाढते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं होतात. पैशांची तंगी जाणवते. खर्च वाढतो. त्यामुळे जुने लोक आजही कायम सल्ला देत असतात, की बादलीचा वापर झाल्यानंतर ती भरून ठेवावी. जर बाथरूममध्ये बादली भरलेली असेल तर नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. घरात सुख शांती येते. पैशांची कमतरता भासत नाही. घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्ज राहाते.
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनि देव किंवा राहुची स्थिती चांगली नाहीये, ज्या लोकांना शनि देवांची साडेसाती सुरू आहे. अशा लोकांनी तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. बाथरूममध्ये कधीही मोकळी बादली ठेवू नये, बादली कायम पाण्यानं भरलेली ठेवावी. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभते. तुमची भरभराट होते. त्यामुळे तुमच्या बाथरूममध्ये कायम बादली भरून ठेवण्याचा सल्ला वास्तुशाशास्त्रात देण्यात आला आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)