महिला नागा साधूंबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या काय असतात महिला नागा साधूंसाठी नियम?

संगमांचे शहर म्हणून ओळख असलेल्या प्रयागराज मध्ये महा कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. महा कुंभमेळ्यात गंगा स्नान करण्यासाठी अनेक नागा साधू येथे पोहोचले आहे. यामध्ये महिला नागा साधूंचा देखील समावेश आहे. जाणून घेवू महिला नागा साधून बद्दल काही आचार्य गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील.

महिला नागा साधूंबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या काय असतात महिला नागा साधूंसाठी नियम?
female Naga Sadhus Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 3:26 PM

प्रयागराज मध्ये आजपासून महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. येथे पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लाखो नागा साधू हे येथे दाखल झाले आहे. पण तुम्ही नागा साधून बद्दल ऐकले असेल की ते सार्वजनिक ठिकाणी इतरवेळी दिसत नाही तर ते फक्त महा कुंभाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी येतात आणि त्यानंतर पुन्हा निघून जातात. नागा साधू मध्ये पुरुषांसोबतच महिलांचा देखील समावेश असतो. जाणून घेऊ महिला नागा साधून बद्दल काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

नागा साधून मध्ये असे अनेक साधू आहेत जे वस्त्र धारण करतात आणि अनेक साधू हे दिगंबरा प्रमाणेच म्हणजेच वस्त्र विरहित असतात. पण जेव्हा स्त्रिया नागा साधू बनण्याची दीक्षा घेतात तेव्हा त्यांनाही नागा बनवले जाते. पण महिला नागा साधू पूर्ण कपडे परिधान करतात.

न शिवलेले कपडे परिधान करतात महिला नागा साधू

महिला नागा साधू न शिवलेले कपडे परिधान करतात. ज्याला गणती असे म्हटले जाते. नागा साधू होण्यापूर्वी स्त्रीला सहा ते बारा वर्षे ब्रह्मचर्य पाळावे लागते. जेव्हा स्त्रिया हे करतात तेव्हा त्यांच्या स्त्री गुरु त्यांना नागा साधू बनण्याची परवानगी देतात.

हे सुद्धा वाचा

जिवंत असतानाच करावे लागते स्वतःचे पिंडदान

महिला नागा साधूला हे सिद्ध करावे लागते की तिने स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केले आहे. आता त्या स्त्रीची संसारिक आस संपली आहे. महिला नागा साधूला स्वतःचे पिंडदान करावे लागते. मागचे आयुष्य मागेच सोडावे लागते. आखाड्याचे सर्वोच्च अधिकारी आचार्य महामंडलेश्वर हे महिला साधू बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.

दिवसभर करतात देवाचा जप

महिला नागा साधू पहाटे नदीत स्नान करतात. यानंतर महिला नागा साधू ध्यान करायला लागतात आणि त्यानंतर दिवसभर देवाचा जप करतात. सकाळी उठून महादेवाची पूजा करतात आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर दत्तात्रेयाची पूजा करतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.