Lord Vishnu Puja | गुरुवारी चुकून ही या गोष्टी करु नका नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील

गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

Lord Vishnu Puja | गुरुवारी चुकून ही या गोष्टी करु नका नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील
shattila ekadashi 2022
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:30 PM

मुंबई : गुरुवार (Thursday) हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. ज्योतिषांच्या मते गुरु ग्रहाच्या प्रबळ उपस्थितीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी (Happiness) कायम राहते. जर कोणाचे लग्न (Marriage) होत नसेल तर गुरुवारची पूजा केल्याने फळ मिळते, याशिवाय संततीप्राप्तीसाठीही या दिवशी पूजा केली जाते. दर गुरुवारी विशेष उपवास केला जातो. गुरुवारचे व्रत खरमास आणि चातुर्मास वगळता केव्हाही सुरू करता येते , परंतु काही महिन्यांत शुक्ल पक्ष असावा. पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी कोणते काम कधीही करू नये ज्यामुळे प्रत्येक फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊयात.

गुरुवारी चुकूनही हे करू नका

गुरुवारी घरात कोणीही केस कापू नयेत. असे केल्यास अनावधानाने संकटे येतात.

या दिवशी विशेषतः महिलांना केस धुण्यास मनाई आहे. असे केल्यास घरातील धन नष्ट होते.

गुरुवारी कधीही साबण लावून कपडे धुवू नयेत. ज्योतिषांच्या मते, गुरुवारी साबण आणि शाम्पूचा वापर केल्याने गुरु कमजोर होतो.

याशिवाय या दिवशी नखे कापू नयेत. या दिवशी गुरु कमजोर झाल्यास घरातील सुख-संपत्ती नष्ट होते, असे मानले जाते.

गुरुवारचा दिवस असल्याने कोणीही उधारीचे व्यवहार करू नयेत.

या दिवशी स्नान केल्याशिवाय राहू नये.

या दिवशी, विशेषत: उपवास करणाऱ्यांनी केळी आणि कोणत्याही प्रकारचा तांदूळ खाऊ नये.

घरात झाडू घेतल्याशिवाय कुठेही बाहेर पडू नये.

गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम करु नये, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.

गुरुवारी काय करावे याचे महत्त्व या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छता करावी, या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी केळीच्या झाडाची आणि भगवान विष्णूची पूजा करावी, पूजेमध्ये गूळ, हरभरा डाळ, केळी, पिवळे चंदन आणि फुले अर्पण करावीत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.