हातात घड्याळ घालताना 5 गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर अडथळ्यांमध्ये वाढ होईल
तुमचे मनगटावरील घड्याळ (Wristwatch) तुमचे नशीब देखील बदलू शकते. फक्त घड्याळ परिधान करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.वास्तुशास्त्रानुसार यासाठी काही नियम आहेत ज्यांचे पालन करावे. मनगटावर घड्याळ घालताना या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात.
मुंबई : तुमचे मनगटावरील घड्याळ (Wristwatch) तुमचे नशीब देखील बदलू शकते. फक्त घड्याळ परिधान करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.वास्तुशास्त्रानुसार यासाठी काही नियम आहेत ज्यांचे पालन करावे. मनगटावर घड्याळ घालताना या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात.
कोणत्या रंगाचे घड्याळ परिधान कराल
वास्तूनुसार सोनेरी आणि चंदेरी रंगाचे घड्याळ चांगले मानले जाते. नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा परीक्षेला जाताना सोनेरी किंवा चांदीचे घड्याळ घाला.
मनगटाचे घड्याळ उशीखाली ठेवू नका
अनेक लोकांना रात्री मनगटाचे घड्याळ उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. पण मनगटावर घड्याळ कधीही उशीखाली ठेवू नका. यामुळे तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा येईल आणि झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
नेहमी योग्य घड्याळ परिधान करा
सैल पट्ट्याचे घड्याळ कधीही घालू नका. या प्रकारची घड्याळ घातल्याने तुमचे लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित होत नाही. वास्तूनुसार घट्ट घड्याळ न घातल्यास तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यात अडचण येईल.
घड्याळाचे डायल
घड्याळ घालताना लक्षात ठेवा की घड्याळाचा डायल खूप मोठा नसावा. मोठे डायल घड्याळ घातल्याने तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्याच वेळी, खूप लहान डायल असलेले घड्याळ घालू नका. घड्याळाच्या डायलच्या आकाराबद्दल बोलायचे तर, गोल किंवा चौकोनी आकाराचा डायल अधिक शुभ मानला जातो.
कोणता हात घालायचे घड्याळ
वास्तूनुसार घड्याळ कोणत्या हातात घालायचे असा कोणताही नियम नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार उजव्या किंवा डाव्या हातात घड्याळ घालू शकता.
इतर बातम्या :
Garuda Purana | गरुड पुराणातील 4 गोष्टींचे पालन करा, मोक्ष प्राप्त होईल
चुकूनही 6 गोष्टी दान करु नका, नाहीतर आयुष्यात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येतील
Garuda Purana | गरुड पुराणातील 4 गोष्टींचे पालन करा, मोक्ष प्राप्त होईलhttps://t.co/kzrzVZF957#GarudaPurana | #GarudaPuranaGyan | #LordVishnu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021