Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 7 May 2022 : भावनिक होऊ नका,काम करण्याआधी नियोजन करा

आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

Horoscope 7 May 2022 : भावनिक होऊ नका,काम करण्याआधी नियोजन करा
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 6:20 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मकर –

कोणतंही काम करण्याआधी नियोजन करा. सकारात्मक विचार करा. त्याने तुम्हाल नवी दिशा प्राप्त होईल. घरात काही बदल करायचं सुरू असेल तर वास्तुच्या नियमांचा नक्की सल्ला घ्या. जास्त विचार करण्यात वेळ घालविल्याने तुमच्या हातातील चांगल्या संधी जाण्याची शक्यता आहे. अतिशिस्त प्रिय असणं तुमच्या कुटू्ंबासाठी त्रासदायक ठरू शकतं. व्यवसायत तुमची कार्यक्षमता अधिक वाढवा. यावेळी वेळेचे ग्रह तुम्हाला अधिक ऑर्डर उपलब्ध करून देणार आहेत. नोकरदार व्यक्तिना लवकरच त्यांच्या मनाप्रमाणे स्थान मिळेल.

लव फोकस – वैवाहिक जीवन सामान्य राहिल. प्रेम प्रकरणात भावनिक दूरू निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घ्या.

खबरदारी – जास्त तणावामुळे एसिडिटी आणि डोकेदुखी सारख्या समस्या राहतील. जास्त भावनिक होऊ नका.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

कुंभ –

मुलांच्या बाबतीत चिंता दूर झाल्याने घरात सुखाचे वातावरण राहिल. आज महत्वपूर्ण निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गुंतवणूकी संबंधीत कामासाठी आजचा दिवस उत्तम आहे.शेअर, सट्टेबाजी सारख्या कामापासून लांब राहा. गैरवर्तणूक तुमच्या मानहानीचे कारण होऊ शकते. नकारात्मक लोकांपासून लांब राहा.घरातील कामामुळे कामावर जास्त लक्ष देता येणार नाही. पण घरात राहून तुम्हाला फोन द्वारे कामं संभांळता येतील. नोकरीत महत्वपूर्ण टार्गेट पूर्ण होईल.

लव फोकस – घरातील सदस्य एकमेकांप्रति प्रेमाने वागतील आणि घरात सुखमय वातावरण राहिल.

खबरदारी – ताप आणि थकवा वाटेल. गर्मी पासून स्वत: चे रक्षण करा.

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 6

मीन –

घरातील सदस्यांना भेटीचा योग. वेळ मनोरंजनात आणि आनंदात जाईल.तुमच्या कामात घरातील सदस्यांचे सहकार्य आणि सल्ले तुमच्यासाठी भाग्याचे ठरतील.भावंडासोबत संबंध चांगले ठेवा. मुलांच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वागणूकीवर लक्ष द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं तुमची जबाबदारी आहे. धडपडणाऱ्या तरूणांना चांगली बातमी मिळण्याचे संकेत.तुमच्या जोडीदाराची व्यवसायिक वृत्ती तुम्हाला तुमच्या कार्यात जास्त मदत मिळवून देईल. त्यांच्या सल्ल्यांचा आदर करा. त्यांचा सल्ला आमलात आणा. नोकरदारी व्यक्तींची बदली होण्याची शक्यता.

लव फोकस – पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांच्या सहकार्याने नातेसंबंधात अधिक घनिष्टता येईल. प्रेमप्रकरणांपासून लांब राहा.

खबरदारी – कामाचे व्याप आणि तणावाचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडू शकतो. ध्यान आणि योगा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

शुभ रंग – पिवळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 5

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.