Horoscope 5 May 2022 : प्रेम संबंधात गैरसमजामुळे दूरूवा येईल, वागणूकीवर नियंत्रण ठेवा
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडी
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.
‘बृहस्पतिवार, 5 मे 2022’
मेष –
भाग्याचे स्थान प्रबळ आहे. घरातील मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. त्यांचा सल्ला आमलात आणा. असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. एखादी खास वस्तू हरविण्याची चिन्ह आहेत. स्वत:च्या वस्तू स्वत: संभाळा. भावंडापासून संबंध खराब होवू नयेत याची काळजी घ्या. नकारत्मक गोष्टी नात्यात आणू नका. गेल्या काही काळापासून व्यवसायात चाललेला त्रास कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कोणतंही महत्वाचं कार्य स्वत:च्या देखरेखीत करा. अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवू नका त्याने नुकसान होवू शकतं.
लव फोकस – प्रेम संबंधात गैरसमजामुळे दूरूवा येईल. एकमेकांवर विश्वास ठेवा. वैवाहिक जीवनात आनंद असेल. खबरदारी – आरोग्य ठीक राहिल. पण दिनचर्या आणि खाण्या – पिण्याकडे लक्ष द्या. शुभ रंग – बदामी भाग्यवान अक्षर – अ अनुकूल क्रमांक – 3
वृषभ
काही वेळ आत्मनिरीक्षण आणि आत्मचिंतनासाठी द्या. कुशलता आणि समजदारपणामुळे सुखद परिणाम अनुभवायला मिळतील. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या समोर पराभूत होतील. समाजात मान संन्मान मिळेल. घराशी संबंधित कामांमध्ये अति उधळपट्टीची परिस्थिती राहील. तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. दिखाव्याच्या नादात स्वत: चे नुकसान होवू शकते.अहंकाराला तुमच्या वागणुकीवर प्रभुत्व मिळवू देऊ नका.
पार्टनरशीप संबंधी व्यवसायातील कामे संथ गतीत चालतील. पण काळानुरूप गोष्टी सुधारतील त्यामुळे काळजी करू नका. पार्टनशीपच्या व्यवसायात कामं पूर्ववत चालू राहतील. तसंच कामात लाभ होण्याची शक्यता आहे.
लव फोकस – नवरा बायकोच्या नात्यात टोकाचे वाद होतील. त्याचा परिणाम कुटूंबावर देखील होईल. त्यामुळे वागणूकीवर नियंत्रण ठेवा.
खबरदारी – उन्हाळ्यामुळे वायरल ताप येण्याची शक्यता आहे. योग्य काळजी आणि आरामाजी तसचं उपचराची गरज आहे.
शुभ रंग – सफेद भाग्यवान अक्षर – म अनुकूल क्रमांक – 8
मिथुन
आजचा दिवस समिश्र फलदायी राहिल. दुसऱ्यांकडून मान संन्मानाची अपेक्षा असेल तर आधी दुसऱ्यांचा मान संन्मान देखील करावा लागेल. राजकारणाशी संबंधित लोकांना महत्वाचे पद मिळू शकते. कोणत्या धार्मिक संस्थेसाठी सहाकार्य चालू राहिल.
पैश्यांची उधारी विचारपूर्वक करा. कारण पैसे परत मिळणं अवघड आहे. त्याचबरोबर मीडिया आणि संपर्काचा वापर वाढवणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. ऑफिसचे वातावरण निवांत राहिल.
लव फोकस – कैटुंबिक वातावरण आनंददायी असेल. कुटूंबात हास्यविनोदात आणि मनोरंजनात चांगला वेळ जाईल. खबरदारी – पोटाचे आरोग्य बिघडू शकते. पण, घबरदारी घेतली तर तुमचं स्वास्थ्य ठीक राहिल.
शुभ रंग – केसरी भाग्यवान अक्षर – ब अनुकूल क्रमांक – 9