Dream Astrology: स्वप्नात दिसणाऱ्या या अशुभ घटना देतात शुभ संकेत, घाबरुन जावू नका
प्रत्येक व्यक्तीला रात्री झोपताना काही ना काही स्वप्ने पडतात. प्रत्येक स्वप्न आपल्याला भविष्याबद्दल काही संकेत देत असतात. आज तुम्हाला अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहोत ज्या अशुभ असतात पण शुभ संकेत देत असतात. अशी स्वप्न कोणती आहेत चला तर मग जाणून घेऊया.
Bad Dreams Meaning : स्वप्न शास्त्रात असे मानले जाते की स्वप्ने आपल्या नजीकच्या भविष्याशी संबंधित असतात. स्वप्नात दिसणार्या घटना आपल्याला भविष्याबद्दल शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात. अशा काही घटना आहेत ज्या माणसाला घाबरवतात, परंतु या खूप शुभ मानल्या जातात.
मृत्यूशी संबंधित स्वप्ने
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू दिसला तर तो निश्चितच त्याचा चुकीचा अर्थ लावतो किंवा भविष्यात काही अशुभ घटना घडणार आहे असा विचार करू लागतो. पण स्वप्न शास्त्रात अशी स्वप्ने शुभ मानली जातात. असे स्वप्न सूचित करते की ज्या व्यक्तीचा मृत्यू आपण आपल्या स्वप्नात पाहिला आहे त्याला दीर्घायुष्य मिळणार आहे. त्याच वेळी, स्वप्नात स्वत: ला आत्महत्या करताना पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमचे वय वाढले आहे.
स्वत:ला गरीब पाहणे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःला गरीब होताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की भविष्यात त्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. पण स्वप्न शास्त्रात हे स्वप्न शुभ मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. किंवा कुठेतरी अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.
ही स्वप्ने चांगली आहेत
स्वप्नात साप दिसल्यास कोणतीही व्यक्ती घाबरू शकते. पण घाबरण्याची गरज नाही कारण स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न शुभ मानले जाते. हे स्वप्न एक चिन्ह आहे की लवकरच तुम्हाला सरकारी क्षेत्राकडून लाभ मिळणार आहेत. त्याचबरोबर लोक स्वप्नात स्मशान दिसले तरी ते अशुभ मानतात. तर हे स्वप्न सूचित करते की तुम्हाला लवकरच सन्मान मिळणार आहे.
अस्वीकरण : ‘या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. ज्योतिषी/पंचांग याच्या माध्यमातून दिलेली ही माहिती आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.