स्वप्ने देतात तुमच्या भरभराटीचे संकेत; जाणून घ्या लक्ष्मीदेवता प्रसन्न होण्याचे संकेत
जर आपणाला धनदेवता लक्ष्मीबद्दल बोलायचे झाले तर तिचा आशीर्वाद मिळवण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो, परंतु तुम्हाला माहित आहे का, की लक्ष्मीमातेची कृपा मिळण्याचे संकेतसुद्धा त्याच स्वप्नांमध्ये दडलेले असते.
मुंबई : स्वप्नांचे स्वत:चे एक वेगळे जग असते. स्वप्नात रममाण झालेल्या कोणत्याही व्यक्तीवर इतर कोणतीही जादू चालत नाही. रात्री झोपेत आपल्याला चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची स्वप्ने दिसतात. आपली झोपमोड झाल्यानंतर आपण त्यातील काही स्वप्ने विसरतो, तर काही आश्चर्यकारक स्वप्ने आपल्या नेहमी लक्षात राहतात. आपणाला विचित्र स्वप्नांद्वारे भविष्यातील संकटांचे संकेत देखील मिळतात. ऋषीमुनींनी त्यांच्या स्वप्नांच्या शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल त्यांच्या अनुभवाच्या आधारे तपशीलवार सांगितले आहे. जर आपणाला धनदेवता लक्ष्मीबद्दल बोलायचे झाले तर तिचा आशीर्वाद मिळवण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो, परंतु तुम्हाला माहित आहे का, की लक्ष्मीमातेची कृपा मिळण्याचे संकेतसुद्धा त्याच स्वप्नांमध्ये दडलेले असते. (Dreams give signs of your prosperity; Know the sign of goddess Lakshmi being pleased)
1. जर तुम्हाला स्वप्नात आकाशात काळे ढग जमल्याचे दिसले तर समजून जा की तुम्हाला व्यवसायात नुकसान होऊ शकते. पण जर तुम्हाला स्वप्नात त्याच काळ्या ढगांमधून सुर्यदेव बाहेर पडत असल्याचे दिसले, तर तुम्ही खूप कमी कालावधीत नुकसानीतून बाहेर पडणार आहात हे समजून घ्या.
2. स्वप्नात तुमचे कामाचे ठिकाण, दुकान किंवा कारखाना इत्यादी आगीत जळताना दिसले तर अजिबात घाबरू नका कारण या स्वप्नाचे संकेत तुमच्या नुकसानीशी नाही तर तुमच्या नफ्याशी संबंधित आहे. या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला लवकरच व्यवसायामध्ये नफा मिळेल.
3. जर एखाद्या स्वप्नात तुम्ही तुमचे आवडते संगीत ऐकत असाल तर समजून घ्या की लवकरच आनंद आणि समृद्धी मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
4. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात चांगली लागवडयोग्य जमीन खरेदी करत असाल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येणार आहे.
5. जर स्वप्नात मधमाशी किंवा मधमाशीचा पोळा दिसला तर समजून घ्या की लवकरच तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत.
6. हत्ती, बैल, सिंह आणि समुद्र इत्यादी स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते. जर ते स्वप्नात दिसले तर समजून घ्या की लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत.
7. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पूल ओलांडताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच आर्थिक चिंतांपासून मुक्त होणार आहात आणि व्यवसायात येणारे अडथळे लवकरच दूर होतील.
8. जर तुम्ही स्वप्नात तुमच्या शर्टला बटण लावताना पाहिले तर समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत. पण जर शर्टचे बटण तुटले व त्याच स्वप्नात पडले तर समजून जा की कुठून तरी तुम्हाला नुकसानीचा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
9. जर तुम्ही स्वत:ला स्वप्नात हळद लावताना किंवा लग्न करताना पाहत असाल तर समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत. (Dreams give signs of your prosperity; Know the sign of goddess Lakshmi being pleased)
नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच, 383 घरांमध्ये अळी आढळल्या#Nagpur #Dengue #DengueFreeCity https://t.co/eQVoUmauO5
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
इतर बातम्या
Video | अद्भूत आणि अजब ! जगातील सर्वात उंच इमारतीवर सुंदर महिला, धाडसाला नेटीझन्सचा सलाम !
पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार? ईपीएफओने दिली ही महत्त्वपूर्ण माहिती