या ५ कारणांमुळे व्यक्तीच्या हातात राहत नाही पैसा, जाणून घ्या

आपण वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशा न पाहता वस्तू ठेऊन देतो त्यामुळे अनेकदा वास्तुदोष लागतो व घरात पैसे येत नाहीत. व त्याचा सुद्धा परिणाम आपल्या आर्थिक संपत्तीवर होत असतो.

या ५ कारणांमुळे व्यक्तीच्या हातात राहत नाही पैसा, जाणून घ्या
Money
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 3:05 PM

आपल्या हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची व संपत्तीची देवी म्हटले जाते. जेव्हा देवी एखाद्यावर कोपली तर त्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. हिंदू धर्मात वास्तुला खूप महत्त्व आहे. वास्तूमध्ये, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट स्थान आणि दिशा नियुक्त केली आहे. असे मानले जाते की, वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने माणसाला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. त्याचप्रमाणे जर आपण वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशा न पाहता वस्तू ठेऊन देतो त्यामुळे अनेकदा वास्तुदोष लागतो व घरात पैसे येत नाहीत. व त्याचा सुद्धा परिणाम आपल्या आर्थिक संपत्तीवर होत असतो.

तुम्ही पाहतच असाल कि अनेकवेळा लोकं चांगले कमावतात पण योग्य पद्धतीने पैसा जमा करू शकत नाहीत. तर काही लोकं कमी कमावतात, पण त्यांच्या हातात नेहमीच पैसा असतो. जर तुमच्या हातात पैसा राहत नसेल तर वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात वास्तू टिप्स .

घराच्या या दिशेला कचरापेटी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात कचरापेटी ठेवू नये. असे मानले जाते की या दिशेला कचरापेटी ठेवल्याने घरात पैसे येत नाहीत. घराच्या स्वच्छतेचा थेट परिणाम हा आपल्या आर्थिक स्थितीवर होत असतो.

नळातून सतत पाणी गळणे अत्यंत अशुभ मानले जाते

नळातून गळणारं पाणी वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. त्याचा माणसाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. तर घरातील अनावश्यक खर्च वाढतो. म्हणूनच तुटका नळ लवकर दुरुस्त करावा. जेणेकरून पैसा पाण्यासारखा वाहून जाण्यापासून रोखता येईल.

स्वयंपाकघर या दिशेला बांधू नका

वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधू नये. जर तुम्ही पश्चिम दिशेस स्वयंपाकघर बांधल्यास घरात पैशाची आवक चांगली राहते पण आशीर्वाद मिळत नाही. म्हणजे पैसा येताच खर्च होत राहतो. त्यामुळे घराचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे. वास्तूनुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा, ज्यावर अग्निदेवता किंवा अग्निदेवतेचे राज्य असते.

तिजोरीची दिशा

घरातील तिजोरी जर चुकीच्या दिशेला असली तर त्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होतो. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून अशा प्रकारे बांधावी की ती उत्तर दिशेला त्याचे तोंड येईल. असे मानले जाते की तिजोरी उत्तर दिशेकडे असताना देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते.

घरात तुटलेले पलंग ठेवू नका

घरात कोणत्याही तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. वास्तुनियमांनुसार घरात तुटलेला पलंग ठेवू नये, तुटलेल्या वस्तू घरात असल्यावर पैश्याची कमतरता भासू लागते . त्यामुळे तुम्ही घरातून तुटलेल्या वस्तू काढून टाकल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात पैशांची आवक वाढते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.