Dussehra 2021: विजयादशमी कधी आहे ? महत्त्व काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती
याच दिवशी दुर्गामातेने महिषासूरावर विजय मिळवल्याचेही म्हटले जाते. दसरा हा सण नवरात्रोत्सवानंतर साजरा केला जातो. या वर्षी हा सण 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
मुंबई : सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. या नऊ रात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव संपल्यानंतर दसरा साजरा केला जातो. नऊ दिवसांनंतर विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
या वर्षी दसरा 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार
विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण आहे. कारण या दिवसाकडे रावणरुपी राक्षसावर भगवान रामाने विजय मिळव्याचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. या व्यतिरिक्त, याच दिवशी दुर्गामातेने महिषासूरावर विजय मिळवल्याचेही म्हटले जाते. दसरा हा सण नवरात्रोत्सवानंतर साजरा केला जातो. या वर्षी हा सण 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
हा सण प्रामुख्याने उत्तर भारताचा डोंगरी प्रदेश तसेच पश्चिम आणि मध्य भारतात साजरा केला जातो. तसेच, नेपाळ, भूटान आणि म्यानमारच्या काही भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या रुपात साजरा केला जातो. शमी पूजा, अपराजिता पूजा तसेच सिमोल्लंघन अशा काही प्रथा दसरा सणामध्ये पार पाडल्या जातात.
दसरा 2021: तारीख आणि शुभ वेळ
तारीख: 15 ऑक्टोबर, शुक्रवार
विजय मुहूर्त – दुपारी 02:02 ते 02:48 पर्यंत
अपर्णा पूजेची वेळ – दुपारी 01:16 ते दुपारी 03:34 वाजेपर्यंत
दशमी तिथी सुरूवात – 14 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 06:52 वाजता
दशमीची तारीख संपण्याची वेळ – 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 06:02 वाजता
श्रावण नक्षत्राची सुरूवात – 14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 09:36 वाजता
श्रावण नक्षत्र संपणार – 15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 09:16 वाजता
दसऱ्याचे महत्व काय आहे ?
दसरा म्हणजे वाईटावर चांगल्या वृत्तीचा विजय. दसरा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत. त्यामधील एका कथेनुसार महिषासुर राक्षसाने देवी-देवतांमध्ये दहशत तसेच भीतीचे वातावरण निर्माण केले होते. याच कारणामुळे देवांनी महादेवाची मदत मागितली. त्यानंतर महादेवाने माता पार्वतीकडे राक्षसांचा वध करण्याची शक्ती असल्याचे सांगितले होते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीच दुर्गामातेने महिषासुराचा वध केला होता. तसेच याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता. म्हणूनच दसरा या सणाला विशेष महत्त्व आहे.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला तांदूळ, दही तसेच कुंकू यांच्या मदतीने कपाळावर टिळा लावला जातो. घरातील सर्वच सदस्यांच्या कपाळावर टीळा लावला जातो. तसेच, टिळ्यातील लाल रंग हा रक्ताचे प्रतिक असून त्याच लाल रंगाच्या माध्यमातून कुटुंबाला एकत्र जोडले जाते, असे म्हटले जाते. या दिवशी वडीलधाऱ्या व्यक्ती घरातील छोट्या मुलांना दक्षिणा देतात. तसेच छोट्या मुलांचे सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
(टीप- वर दिलेली माहिती ही धार्मिक तसेच लोकमान्यतेवर आधारलेली आहे. या महितीमागे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. वाचकांची आवड लक्षात घेऊन वरील माहिती देण्यात आली आहे.)
इतर बातम्या :
Palmistry : तळहातावरील तीळ काय सांगतो? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
(dussehra 2021 when is vijayadashami know about vijayadashami how to celebrate important date and rituals)