AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dussehra 2023 : या वर्षी किती तारखेला आहे दसरा? फक्त रावण दहनच नाही तर या कारणासाठीही साजरा केला जातो हा सण

पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला, त्याच्या निमित्ताने दसरा साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.

Dussehra 2023 : या वर्षी किती तारखेला आहे दसरा? फक्त रावण दहनच नाही तर या कारणासाठीही साजरा केला जातो हा सण
दसराImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 8:08 AM

मुंबई : दसरा (Dussehra 2023) हा सण दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या दशमी तिथीला म्हणजेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला, त्याच्या निमित्ताने दसरा साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. तर नवरात्रीच्या दशमी तिथीला मां दुर्गेने महिषासुराचा वध केला, म्हणून दरवर्षी या तिथीला विजयादशमी साजरी केली जाते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते.  दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेची वेळ काय आहे? दसऱ्याला रावणाचा पुतळा दहनाचा मुहूर्त कोणता आहे? ते जाणून घेऊया.

दसरा 2023 शस्त्रपूजेचा शुभ काळ

दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची पद्धत आहे. या आधारावर 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनाचा शुभ मुहूर्त दुपारी 01:58 ते 02:43 पर्यंत आहे. या दिवशी तुम्हाला शस्त्रपूजेसाठी 45 मिनिटांचा कालावधी मिळेल.

दसरा 2023 रावण दहनाचा शुभ मुहूर्त

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. यंदा 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त सूर्यास्तापासून अडीच तासांचा असेल. प्रदोष काळात रावण दहनाचा नियम आहे. सूर्यास्तापासून अडीच तासापर्यंत प्रदोष काल मानला जातो. दसऱ्याचा सूर्यास्त संध्याकाळी 05:43 वाजता होईल.

हे सुद्धा वाचा

भगवान रामाने केला होता रावणाचा वध केला

वाल्मिकी रामायणानुसार, भगवान रामाने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत माँ दुर्गेची पूजा केली. त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी रावणाचा वध केला. त्यासाठी दरवर्षी विजयादशमी उत्सव साजरा केला जातो.

माता दुर्गेने केला होता महिषासुराचा वध

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, महिषासुर आणि माता दुर्गा यांच्यात संपूर्ण नऊ दिवसांचे युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला.  अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी विजयादशमी हा विजय म्हणून साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो.

पांडवांचा वनवास संपला

एका पौराणिक कथेनुसार, या दिवशी पांडवांचा वनवास संपला. त्यानंतर त्यांनी शमीच्या झाडाखाली लपवून ठेवलेले शस्त्र काढले आणि त्याने कौरवांवर हल्ला करून विजय मिळवला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.