Eid Ul Fitr 2023 : संपूर्ण देशात ईदचा उत्साह सुरू, ईदशी संबंधीत या आहेत महत्त्वाच्या मान्यता

काल चंद्र दिसल्याने भारतात ईद आज शनिवार, 22 एप्रिल रोजी साजरी केली जात आहे. लोकं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत, ईदच्या शुभेच्छा संदेश पाठवत आहेत.

Eid Ul Fitr 2023 : संपूर्ण देशात ईदचा उत्साह सुरू, ईदशी संबंधीत या आहेत महत्त्वाच्या मान्यता
रमजान ईदImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 2:42 PM

मुंबई : एक महिन्याच्या कठोर उपवासानंतर आज मुस्लिम समाजातील लोकं मोठ्या उत्साहात ईदचा सण (Eid Ul Fitr 2023) साजरा करत आहेत. सौदी अरेबियामध्ये 21 एप्रिललाच ईद-उल-फित्र सण साजरा केला गेला, मात्र काल चंद्र दिसल्याने भारतात ईद आज शनिवार, 22 एप्रिल रोजी साजरी केली जात आहे. लोकं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत, ईदच्या शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. या दिवशी गोड शेवया ज्याला शिरखुरमा म्हणतात ते खाण्याची आणि खायला देण्याची प्रथा असल्यामुळे या ईदला मीठी ईद असेही म्हणतात. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. चला जाणून घेऊया ईद-उल-फित्रशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.

ईद-उल-फित्रचा इतिहास आणि महत्त्वाच्या गोष्टी

  • असे मानले जाते की प्रथमच ईद-उल-फित्र 624 मध्ये साजरी करण्यात आली. प्रेषित मुहम्मद यांनी बद्रच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर प्रथमच हा सण साजरा केला गेला. तेव्हापासून ईद-उल-फित्र साजरी करण्याची परंपरा सुरू आहे.
  • पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी ईदचा सण साजरा केला जातो. रमजान महिन्याच्या 29 किंवा 30 व्या दिवशी ईद साजरी केली जाते. चंद्र दिसला की दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते.
  • रमजानचा महिना चंद्र दर्शनाने सुरू होतो आणि ईदचा चंद्र पाहून संपतो. वास्तविक, मुस्लिमांचे हिजरी कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे.
  • रमजानच्या पवित्र महिन्यात, मुस्लिम समुदायाचे लोकं कठोर उपवास म्हणजे रोजा ठेवतात आणि त्यांचा बहुतेक वेळ अल्लाहच्या उपासनेत घालवतात.
  • दुसरीकडे, ईदच्या दिवशी विशेष नमाज अदा केली जाते. एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद-उल-फित्रच्या दिवशी गोड शेवया खाल्ल्या जातात, म्हणून त्याला मीठी ईद असेही म्हणतात.
  • ईदच्या शुभेच्छा देणे, बंधुभावाचा संदेश देणे, एकमेकांना शेवया आणि इतर पदार्थ खाऊ घालणे याशिवाय जकातचे खूप महत्त्व आहे. जकात म्हणजे दान. ईदच्या दिवशी, प्रत्येक सक्षम मुस्लिम आपल्या कमाईचा काही भाग गरिबांमध्ये वितरित करतो, जेणेकरून त्यांनाही ईद साजरी करता येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.