Falgun Chaturthi: कधी आहे फाल्गुन महीन्यातील संकष्टी चतुर्थी? अशा प्रकारे करा श्री गणेशाची पूजा

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल. यावेळी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत 09 फेब्रुवारी 2023, गुरुवार रोजी पाळले जाणार आहे.

Falgun Chaturthi: कधी आहे फाल्गुन महीन्यातील संकष्टी चतुर्थी? अशा प्रकारे करा श्री गणेशाची पूजा
गणपतीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 5:47 PM

मुंबई, संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi) महिन्यातून दोनदा येते. एकदा पौर्णिमेनंतर आणि दुसरी अमावस्येनंतर ज्याला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेश विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल. यावेळी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत 09 फेब्रुवारी 2023, गुरुवार रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी गणपतीच्या 32 रूपांपैकी त्यांच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी श्रीगणेशाची आराधना करून व्रत केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. विघ्नहर्ता गणेशाची भक्तावर विशेष कृपा असते, त्याला सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते.

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी गुरुवार, 09 फेब्रुवारी रोजी सकाळी 06.23 वाजता सुरू होईल आणि 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.58 वाजता समाप्त होईल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 09.18 वाजता असेल. उदयतिथीनुसार, द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी यावेळी 09 फेब्रुवारी गुरुवारीच साजरी केली जाईल.

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घाला. घरातील मंदिराची स्वच्छता करा. उत्तरेकडे तोंड करून गणेशाला जल अर्पण करा. पाणी अर्पण करण्यापूर्वी त्यात तीळ टाकावे. दिवसभर उपवास ठेवा. सायंकाळी विधीपूर्वक गणेशाची पूजा करावी. श्रीगणेशाची आरती करावी, भोगामध्ये लाडू अर्पण करावेत. रात्री चंद्राचे दर्शन झाल्यावर अर्घ्य द्यावे. लाडू किंवा तीळ खाऊन उपवास सोडावा. तिळाचे दान करा.

हे सुद्धा वाचा

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय

1. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीच्या तुपात सिंदूर मिसळून दिवा लावावा. त्यानंतर हा दिवा गणेशासमोर ठेवा. या दिवशी गणेशाला झेंडूचे फूल अर्पण करून गुळाचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.

2. केळीचे पान पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यावर रोली चंदन टाकून त्रिकोणाचा आकार तयार करा. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी केळीचे पान ठेवून त्यासमोर दिवा लावावा. यानंतर त्रिकोणी आकाराच्या मध्यभागी मसूर आणि लाल मिरची घाला. यानंतर अग्ने सखस्य बोधि नः मंत्राचा जप करा.

3. गणेशाची पूजा करताना स्वच्छ आणि हिरव्या रंगाचे कपडे घाला. यासोबत पिवळ्या रंगाच्या आसनावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यामुळे श्रीगणेश खूप प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

4. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कपाळावर चंदन, सिंदूर आणि अक्षत यांचा तिलक लावावा. याने भगवान गणेश खूप प्रसन्न होतात आणि त्यासोबतच देशवासीयांचे सौभाग्यही वाढते.

5. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पाच दूर्वामध्ये अकरा गाठी बांधून लाल कपड्यात बांधून श्रीगणेशासमोर ठेवा. यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करावे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.