Pradosh Vrat 2025 : 25 की 26 फेब्रुवारी, फाल्गुन महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त
Pradosh Vrat Puja Vidhi : प्रदोष व्रत महादेवाला समर्पित एक विशेष व्रत आहे. असे म्हटले जाते की प्रदोष व्रत केल्याने महादेवाचा आशिर्वाद मिळतो. त्यासोबतच तुम्हाला जर घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा मिळते आणि तुमच्यावरील सर्व समस्या दूर होतात.

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्वं दिले जाते. प्रदोष व्रताच्या व्रताचे वर्णन शिवपुराणात केले आहे. शिवपुराणातल्या माहितीनुसार, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रताचा उपवास केल्यामुळे आणि या दिवशी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. धार्मिक मान्यतेनुसार, तुमच्या जीवनातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी तुम्ही महादेवाची पूजा करू शकता. प्रदोष व्रताच्या दिवशी स्वच्छ मनानी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या लग्नामध्ये येणाऱ्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:47 वाजता सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजेपर्यंत संपेल. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात सूर्यास्तानंतर केली जाते. अशा परिस्थितीत फाल्गुन महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 25 फेब्रुवारी रोजी पाळला जाईल. हे व्रत मंगळवारी पाळले जाईल, म्हणून त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाईल.
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करण्याचा शुभ काळ 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:18 ते 8:48 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत, भक्तांना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 30 मिनिटे मिळणार आहे. हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. प्रदोष व्रत केल्याने महादेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात. प्रदोष व्रत केल्याने जीवनात आनंद मिळतो त्यासोबतच माणसाचे सर्व त्रास, पापे, आजार आणि दोष दूर होतात. प्रदोष व्रत केल्याने संतती, सुख, समृद्धी, यश आणि संपत्तीची प्राप्ती होते. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यामुळे भक्तांना आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळते आणि त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.




प्रदोष व्रताची पूजा करण्याची विधी….
सकाळी पवित्र स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर महादेवआणि माता पार्वती यांना गंगाजलाने अभिषेक करा. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दही, मध, गंगाजल आणि चंदन अर्पण करा. दिवा लावा आणि भगवान शिवाची आरती करा. “ॐ नमः शिवाय” चा जप करा. गरजूंना अन्न आणि कपडे दान करा.