Horoscope 9 May 2022: भाग्य साथ देईल की दुर्भाग्य वाट बघतंय, जाणून घ्या आजचे राशी भविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई : आजचे राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
आज 9 मे 2022 सोमवार. तुमचाआजचा दिवस कसा जाईल?
मकर राशीच्या लोकांची ग्रहस्थिती खूपच संतोषजनक आहे. गेल्या काही काळापासून जे लोक तुमच्या विरोधात होते. ते आज तुमच्या बाजूने असतील. मुलांच्या भविष्या संबंधातील कार्या शांतिपूर्ण पद्धतीने पार पडतील.
मेष (Aries)
तुमच्या आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. समान विचारांच्या लोकांशी भेट होईल. नवी ऊर्जा मिळेल. ध्येय प्राप्ती मध्ये जवळच्या लोकांचा सहयोग मिळेल. विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात विशेष रुचि राहिल. दुसऱ्या टप्प्यात असं वाटेल की परिस्थिती तुमच्या हातातून जातेय. आर्थिक स्थिती पण फार चांगली नसेल. अशावेळी धैर्य आणि संयम ठेवणं चांगलं. घर- परिवारातील कामात अधिक व्यस्त असल्याने स्वत: वर जास्त लक्ष देता येणार नाही.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना मान-संन्मान आणि आदर्शांवर विश्वास ठेवल्याने यश नक्की मिळेल. स्वत: च काम प्राधान्याने करणे भाग्य निर्माण करू शकते. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कामाचे दायित्व तुमच्यावर असेल. वैयक्तिक कामात इतके व्यस्त असाल की कुटूंब परिवाराकडे जास्त लक्ष देता येणार नाही. ज्यामुळे परिवाराची नाराजी पत्करावी लागेल. मुलांच्या समस्या सोडविण्याकडे थोडा वेळ द्या.
मिथुन (Gemini)
मिथुन राशींच्या लोकांचे अध्यात्मिक तसंच रहस्य जाणून घेण्याची ओढ वाढवेल. त्याने तुम्हाला उत्तम माहिती मिळेल. आर्थिक स्थिती बळक्कट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. प्रॉपर्टीच्या कामात विक्रीच्या बाबत विशेष लाभ मिळण्याची संभावना आहे. अतिशिस्तप्रिय वागणं इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या वागण्यात थोडं परिवर्तन आणणं गरजेचं आहे. कधी-कधी मुलाचं नकारात्म वागणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी व्यर्थ गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा आत्म परिक्षणावर वेळ घालवावा. त्याने तुम्हाला खूप शांती मिळेल. प्रभावशाली लोकांना भेटणं तसंच सामाजिक सक्रियता वाढविल्याने तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. पण, कधी कधी अतिविचार केल्याने हातातील संधी जातील. त्यामुळे पटकन निर्णय घेऊन काम सुरू करा. युवा वर्गाला करिअर संबंधी योजना टाळाव्या लागतील.
सिंह (Leo)
दुसऱ्यांच्या चुका माफ करणं तसंच नाती सहज ठेवणं सिंह राशीची विशेषता आहे. तुमचं परिवारात तसंच समाजात वर्चस्व कायम राहिल. कोणतंही काम करण्याआधी त्याची रुपरेषा तयार करा, त्यानंतर आमलात आणा. तुम्हाला नक्कीच सफलता मिळेल. बाहेरच्या कामात जास्त वेळ दिल्याने व्यक्तिगत कामं राहतील. मुलांवर जास्त बंधनं लादू नका कारण त्याने घराची व्यवस्था बिघडू शकते. विनाकारण रागाने नुकसाण होऊ शकते.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनी आपल्या कामात घाई गडबड करण्यापेक्षा सहज विचापपूर्वक कामं करा. त्याने तुमची कामं व्यवस्थित पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. प्रयत्न करत राहा. घरात बदल करण्याच्या योजना आखल्या जातील. घाईत आणि निष्काळजीपणामुळे काही कामं अर्धवट राहतील. घरातील व्यवस्था चांगली ठेवयची असेल तर कठोर निर्णय घेऊ नका. धैर्य पूर्वक समस्यां सोडविण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष द्या.
तुळ (Libra)
तुळ राशीच्या लोकांचे कोणते राजकीय काम राहीले असेल तर आज ते पूर्ण करायची योग्य वेळ आहे. गेल्या काही काळापासून चाललेल्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. महिलावर्गा त्यांच्या परिवारा प्रति असलेल्या जबाबदाऱ्या निभावतील. नकारात्मक लोक तुमची निंदा करतील. पण त्याने तुमचे नुकसान होणार नाही. आर्थिक उठाठेवी होतील. यावेळी वायफळ खर्चावर नियंत्रण लावणं गरजेचं आहे. शेजाऱ्यांसोबत संबंध बिघडू देऊ नका.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. आध्यात्मिक कामात ही वेळ घालवणं तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देईल. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे काम पूर्ण करायचा प्रयत्न करा. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. बॅकेच्या कामात अडथळा आल्याने मनात धाकधुक असेल. आर्थिक कामात हात अकडते घ्याल. कोणाकडून उसणे पैसे घेऊ नका.
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांच्या घरी जवळच्या लोकांचे येण्याने मनोरंजन आणि उत्साहपूर्ण वातावरण राहिल. प्रॉपर्टी संबंधित खरेदी विक्रीच्या योजना होत असतील तर त्याकडे नीट लक्ष द्या. अनोळखी लोकांकडे लक्ष देऊ नका. फसवले जाऊ शकता. तुमच्या योजना आणि कामांबद्दल कोणालाच काही सांगू नका. त्याचबरोबर हे ही लक्षात ठेवा आळस आणि जास्त विचार करण्याने हातातून चांगली संधी जाऊ शकते.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांची ग्रहस्थिती समाधानकारक आहे. गेल्या काही काळापासून जे लोक तुमच्या विरोधात होते, ते आता तुमच्या बाजूने असतील. मुलांच्या भविष्यासंबंधीत कामं शांतपणे पार पडतील. यावेळी तुमची प्रतिभा ओळखा आणि पूर्ण उत्साहाने आपल्या दिनक्रमावर आणि कामांवर लक्ष द्या. तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेवू शकतात त्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांची प्रकरणं सोडविण्याच्या नादात तुमच्या हातातून काही लाभदायक संधी निघून जाण्याची शक्यता आहे. दिखाव्याच्या प्रवृत्तीपासून लांब राहा.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांची एखाद्या व्यक्तीसोबत झालेली ओळख प्रगतीच्या संधी निर्माण करेल. लाभदायक मुद्द्यांवर विचार होईल. धार्मिक संस्थांसोबत त्याच्या कामात सहकार्य करणं तुमचा मान संन्मान वाढवेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल येतील. तुमच्या वैयक्तिक कामात कोणत्या बाहेरच्या व्यक्तिला घेऊ नका. कोणतीही योजना करण्याआधी त्यावर पूनर्विचार करा. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात लक्ष देणं आवश्यक आहे.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांचे प्रॉपर्टी किंवा इतर राहिलेली कामं राजकीय व्यक्तीद्वारे सहज होऊ शकतात. त्याचबरोबर तुमचे समाजातील वर्चस्व देखील वाढेल. तुम्ही तुमच्या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष द्याल. सोसायटी संबंधीत विवादात तुमचा प्रस्ताव निर्णायक राहिल. आळस आणि निष्काळजीपणामुळे होत असलेली कामं अर्धवट राहतात. याअवगुणांवर नियंत्रण ठेवा. व्यर्थ वाद विवाद टाळा.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)