चुकूनही पलंगाखाली या वस्तू ठेवू नका, नाही तर आयुष्य… असं काय घडतं?

फेंगशुईनुसार, पलंगाखाली वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या झोपेसाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी पलंगाखाली जागा मोकळी ठेवा. बॉक्स किंवा कोणत्याही वस्तू पलंगाखाली ठेवल्याने निद्रानाश आणि मानसिक तणाव येऊ शकतो. फेंगशुईच्या टिप्सचा अवलंब करून तुमच्या घरात सकारात्मकता आणा.

चुकूनही पलंगाखाली या वस्तू ठेवू नका, नाही तर आयुष्य... असं काय घडतं?
bedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 8:32 PM

अनेक गोष्टींबाबत नेहमी अनेक अख्यायिका असतात. त्याची मनात सतत भीती असते. त्याची जर अध्यात्माशी सांगड घातली तर मग बघायलाच नको. लोकांच्या मनात अजून धास्ती बसते. चीनच्या फेंगशुई वास्तूशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत. आज या फेंगशुईच्या टिप्सनुसार शेकडो लोक घर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. घरात बरकत राहावी, कोणतंही संकट येऊ नये म्हणून लोकांचा अटापिटा असतो. घराचा दरवाजा कुठे असावा इथपासून ते आरसा कुठे ठेवावा इथपर्यंत लोक काळजी घेताना दिसतात. एवढेच नव्हे तर पलंगाच्या खाली कोणत्या वस्तू असाव्यात आणि असू नये याचीही खबरदारी लोक घेताना दिसत आहेत.

फेंगशुई टिप्सनुसार वास्तू दोषामुळे एखादी व्यक्ती कंगाल होऊ शकते. तुमच्या पलंगाखाली जर काही वस्तू असतील तर त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. तुमचं मानसिक स्वास्थ हरवलं जाऊ शकतं. त्यामुळे पलंगाखाली काही वस्तू असू नये असं फेंगशुई सांगते. पलंगाखाली काय ठेवल्याने काय होतं, यावर टाकलेला हा प्रकाश.

पलंगाखाली बॉक्स

काही लोक पलंगाखाली बॉक्स तयार करतात. सामान ठेवण्यासाटी पलंगाखाली बॉक्स बनवला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तू या बॉक्समध्ये ठेवल्या जातात. अशा प्रकारचे डिझाईनच आजकाल मार्केटमध्ये आले आहेत. पण पलंगाखाली बॉक्स असलेले पलंग न घेतलेलेच बरे. कारण फेंगशुई टिप्समध्ये असे पलंग अशुभ मानले जातात.

छोट्या किंवा मोठ्या वस्तू

फेंगशुईच्या मते आपण ज्या पलंगावर झोपतो, त्याच्या खाली काहीच असता कामा नये. मग ती वस्तू छोटी असो वा मोठी, झोपताना पलंगाखाली या वस्तू असताच कामा नये. अशा वस्तू मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करत असतात.

मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम

फेंगशुईनुसार झोपताना आपल्या पलंगाखाली ज्या प्रकारची वस्तू असते त्यानुसार आपल्या मन आणि मेंदूवर परिणाम होत असतो. जर पलंगाखाली घाण असेल, प्रचंड सामान असेल तर आपलं मन बैचेन होतं. या गोष्टीमुळे आर्थिक चणचणही निर्माण होते, असं फेंगशुई सांगते.

झोप लागत नाही

पलंगाखाली काही वस्तू असतील तर निवांत झोप लागत नाही. मन बैचेन होतं. काही तरी ओझं मनावर असल्याचं वाटतं. मानसिक त्रास होतो आणि दिवसभर व्यक्ती त्रस्त असतो. त्यामुळे झोप येत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके.
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड.