Surya Grahan 2021 : 10 जूनला वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण, चुकूनही ही कामं करु नका
वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 10 जून रोजी होणार आहे (First Solar Eclipse). अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.
मुंबई : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 10 जून रोजी होणार आहे (First Solar Eclipse). अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी पूर्ण सूर्यग्रहण होईल. सूर्यग्रहणाच्या दिवशी रिंग ऑफ फायर दिसून येईल. पण, भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसेल. म्हणून सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळ मानला जाणार नाही. ज्योतिषांच्या मते या ग्रहणाचा परिणाम काही राशींवर दिसून येईल. या सूर्यग्रहणाचा परिणाम वृषभ राशीवर होईल. शास्त्रानुसार सूर्यग्रहणादरम्यान काय टाळावे जाणून घ्या (First Solar Eclipse Of 2021 Do Not Do These Mistakes During Grahan) –
सूर्यग्रहण किती काळ लागेल
10 जून रोजी सूर्यग्रहण गुरुवारी दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी लागेल आणि संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. सुतक कालावधी सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरु होईल. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर कॅनडा आणि रशिया आणि आशियामध्ये अंशतः दिसेल. या ग्रहणाचा कोणताही परिणाम भारतात होणार नाही. त्यामुळे धार्मिक कार्ये होतील.
ग्रहणात ही कामे करु नये
1. सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळात काहीही खाऊ नये. मान्यता आहे की याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
2. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करु नये. त्याने देवाच्या मूर्ती दुषित होतात.
3. सूर्यग्रहणावेळी सूर्याला थेट डोळ्यांनी पाहू नये. हे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते.
4. सूर्यग्रहण सुरु असताना गर्भवती महिलांनी काहीही खाऊ-पिऊ नये. याशिवाय सुई-धागाही वापरु नये.
– भारतात ग्रहणाचा परिणाम दिसून येणार नाही, तरीही ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी आणि काही कामे न करण्याचा सल्ला दिला आहे.
1. ग्रहण होण्यापूर्वी स्नान करा. या दरम्यान, शक्य तितक्यावेळा परमेश्वराचे स्मरण करा.
2. सूर्य मंत्रांचा जप करावा.
3. ग्रहण काळात राग किंवा कोणाचीही निंदा करु नये.
4. ग्रहणावेळी कात्री, चाकू इत्यादी वापरु नयेत.
Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ कुठे दिसेल आणि कसे पाहावे?https://t.co/SOBfduDPRt#solareclipse
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2021
First Solar Eclipse Of 2021 Do Not Do These Mistakes During Grahan
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या
Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान ही कामं करा, घरात सुख-समृद्धी नांदेल