वर्षातील पहिले सूर्यग्रहण धोकादायक? कधी आहे सूर्यग्रहण?
सूर्यग्रहण ही एक विशेष खगोलीय घटना आहे. 2025 मध्ये होणाऱ्या पहिल्या सूर्यग्रहणाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. 2025 सालचे पहिले सूर्यग्रहण केव्हा होणार आहे आणि हे सूर्यग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसणार आहे ते जाणून घेऊ.
नवीन वर्ष सुरू होताच लोकांमध्ये व्रत आणि सणांविषयी तसेच ग्रहांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. ग्रहण हे दरवर्षी घडणाऱ्या खगोलीय घटनांपैकी एक महत्त्वाची घटना आहे. 2025 मध्ये चार ग्रहण होणार आहे. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण नेहमी चर्चेत असते. 2025 मध्ये होणाऱ्या पहिल्या सूर्यग्रहणाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काही लोकांचे असे मत आहे की 2025 सालचे पहिले सूर्यग्रहण हे धोकादायक असेल. तर शास्त्रज्ञांचे यावर वेगळे मत आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण धोकादायक असेल की नाही हे येणारा काळात सांगेल.
नवीन वर्ष 2025 चे पहिले सूर्यग्रहण हिंदू नववर्षाच्या एक दिवस आधी होणार आहे. 2025 मध्ये हिंदू नववर्ष 30 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. हिंदू नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हे ग्रहण कधी लागेल आणि ते कुठे दिसणार आहे हे जाणून घेऊ.
यावर्षी कधी आहे पहिले सूर्यग्रहण?
2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आंशिक असेल पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे आंशिक सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 2: 20 मिनिटांनी सुरू होईल आणि 6: 13 मिनिटांनी संपेल.
कुठे दिसणार आहे हे सूर्यग्रहण?
2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, आइसलँड, ग्रीनलँड, उत्तर अटलांटिका महासागर, युरोप आणि उत्तर पश्चिम रशियामध्ये दिसणार आहे. 2025 मध्ये दुसरे सूर्यग्रहण 21-22 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. हे सूर्यग्रहण देखील आंशिक असेल. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10: 59 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3:23 मिनिटांनी संपेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)