Chanakya Niti : हातामध्ये आलेला पैसा टिकतच नाहीये? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टींचे पालन करा आणि मालामाल व्हा!

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे.

Chanakya Niti : हातामध्ये आलेला पैसा टिकतच नाहीये? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टींचे पालन करा आणि मालामाल व्हा!
आचार्य चाणाक्य
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:40 PM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, लोकांना असे वाटते की जीवनाचे ध्येय फक्त पैसा (Money) मिळवणे आहे. श्रीमंत होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याशी संबंधित गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. या गोष्टी नेमक्या कोणत्या याबद्दल जाणून घेऊयात.

जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणाले

आचार्य चाणक्य या श्लोकमध्ये म्हणतात की, माणसाला जीवनात श्रीमंत होण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. व्यक्तीने आपले पैसे वाचवले पाहिजेत. ते पैसे कसे वाचवायचे याची माहिती असावी. जर एखाद्या व्यक्तीला पैशाचा योग्य वापर करता येत नसेल तर तो लवकर गरीब होईल. ज्याप्रमाणे तलावाचे पाणी एकाच ठिकाणी राहत नाही, त्याचप्रमाणे पैसा देखील एकाच ठिकाणी ठेवल्याने माणूस गरीब होतो.

पैशांच्या संदर्भात भूमिका स्पष्ट ठेवा

एवढेच नाही तर चाणक्यच्या मते, पैसे घेण्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीला लाज वाटू नये. जर एखाद्या व्यक्तीला पैसे स्वीकारण्याची लाज वाटत असेल तर तो स्वतःच्या पैशापासून वंचित राहतो. यासोबतच त्याला व्यवसायातही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते, ज्यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब बनते. त्यामुळे पैशाच्या बाबतीत माणसाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे.

चाणाक्याच्या मते, पैशाच्या बाबतीत व्यक्तीने अहंकारी नसावे. जे लोक पैशाचा लोभ आपल्या आयुष्यात ठेवतात आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, ते आयुष्यात कधीच सुखी नसतात. ज्यांना पैशाचा अहंकार असतो, ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. यासोबतच, कोणत्याही व्यक्तीने कधीही पैसे कमवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग निवडू नये.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधित बातम्या : 

MahaShivratri 2022: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करू नका, जाणून घ्या पूजेची पद्धत

Zodiac Signs | या 4 राशींचे भाग्य बदलेल, फक्त संयम ठेवा नशीब उजळेल!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.