Chanakya Niti : दु:खापासून चार हात दूर राहिचे असेल तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्ट नेहमी लक्षात ठेवा…
आचार्य चाणक्य यांनीही निरोगी शरीर हे पहिले सुख मानले आणि नेहमी शरीर आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. आचार्यांनी सांगितले आहे की, संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य सर्वकाही परत मिळवता येते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही.
मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात लोकांचे हित लक्षात घेऊन अनेक उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला आचार्यांनी सांगितलेल्या अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी टप्प्याटप्प्याने उपयुक्त ठरू शकतात. विशेष (Special) म्हणजे आचार्य यांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही जीवनामध्ये फाॅलो केल्यातर तुमचे आयुष्य सुखी जाण्यास नक्कीच मदत होईल. कारण आचार्य यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील (Life) अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. काही गोष्टींकडे आपण जीवन जगत असताना दुर्लक्ष करतो. मात्र, असे केल्याने आपल्याला भविष्यात किती मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याबद्दल आचार्यांनी आपल्या नितीशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
कोणत्याही दुःखाचे मूळ अति लोभ असतो
आचार्य यांनी सांगितले आहे की, कोणत्याही दुःखाचे मूळ अति लोभ असतो. दु:ख टाळायचे असेल तर आसक्तीचा त्याग करणे फार महत्वाचे आहे. जो व्यक्ती आपल्या कुटुंबाशी खूप संलग्न असतो, तो नेहमी भीती आणि दुःखात राहतो. पण ज्याने प्रत्येक क्षणाला सण बनवले आहे, म्हणजेच आनंदाने जगले आहे, ज्याने तक्रारी कमी केल्या आहेत आणि प्रत्येक छोट्या-छोट्या यशासाठी देवाचे आभार मानले आहेत. अशा व्यक्ती नेहमीच आनंदी राहतात.
हे करून तुम्ही नक्कीच यश मिळू शकता
आचार्यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की, ब्राह्मणाचे सामर्थ्य त्याच्या आध्यात्मिक ज्ञानात असते आणि स्त्रीचे सामर्थ्य तिच्या सौंदर्य, तारुण्य आणि गोड बोलण्यात असते. या लोकांनी आपल्या शक्तीचा योग्य वापर केला तर ते काहीही साध्य करू शकतात आणि यश मिळू शकतात.
आरोग्याची आणि शरीराची काळजी घ्या
आचार्य चाणक्य यांनीही निरोगी शरीर हे पहिले सुख मानले आणि नेहमी शरीर आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. आचार्यांनी सांगितले आहे की, संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य सर्वकाही परत मिळवता येते, परंतु हे शरीर परत मिळू शकत नाही. तेव्हा त्याची काळजी घ्या आणि त्यातून चांगली कामे करा. जेणेकरून तुम्ही गेल्यावरही लोकांना तुमची आठवण येईल.
जीवनाचा विचार करताना हे कायम लक्षात ठेवा
जेव्हाही तुम्ही जीवनाचा विचार करता तेव्हा एकदा हे समजून घेतले पाहिजे की पश्चात्ताप कधीही भूतकाळ बदलू शकत नाही आणि तुमची चिंता कधीही भविष्य चांगले करू शकत नाही. जो काही बदल शक्य आहे, तो वर्तमानात करता येईल. त्यामुळे सध्या एकाग्रतेने काम करा. आचार्यांचा असा विश्वास होता की केवळ दोनच लोक समजूतदारपणाबद्दल बोलू शकतात, एक जे मोठे आहेत आणि दुसरे ज्याने लहान वयात अनेक कष्ट केले आहेत.