काय सांगता ! तुमच्या खाण्याच्या सवयी तुमचं नशीब बदलू शकतात? विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन पाहा

तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी तुमच्या ग्रहांची दिशा देखील फिरवू शकतात. खाद्या ज्योतिष शास्त्रावरून आपल्याला ही सर्व माहिती मिळते.

काय सांगता ! तुमच्या खाण्याच्या सवयी तुमचं नशीब बदलू शकतात? विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन पाहा
food
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 1:25 PM

मुंबई : तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांना शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील काही बदल तुमच्या खाण्या सोबत संबंधीत आहेत. तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी तुमच्या ग्रहांची दिशा देखील फिरवू शकतात. खाद्या ज्योतिष शास्त्रावरून आपल्याला ही सर्व माहिती मिळते.

ग्रहानुसार अन्न खावे कुंडलीतील कमजोर ग्रहाशी संबंधित गोष्टी खाल्ल्याने तो ग्रह बलवान होतो आणि चांगले परिणाम देऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी

सूर्य:

सूर्य हा ग्रह आपल्याला यश, आत्मविश्वास, सन्मान प्रदान करतो, कुंडलीत सूर्य बलवान होण्यासाठी व्यक्तीने आहारात गहू, आंबा, गूळ या पदार्थांचा समावेश करु शकतो.

चंद्र :

पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रापासून चांगले फळ मिळण्यासाठी ऊस, साखर, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई, आईस्क्रीम इत्यादी खावे.

मंगळ :

मंगळाच्या अशुभतेमुळे वैवाहिक जीवन, जमीन आणि संपत्तीच्या समस्या येतात. ते मजबूत करण्यासाठी आहारात गूळ, मसूर, डाळिंब, जव आणि मधाचा सामाविष्ट करा

बुध :

बुध ग्रह बुद्धी, व्यापार-उद्योग, आर्थिक स्थिती प्रभावित करतो. त्यामुळे अशुभ परिणाम मिळत असल्यास वाटाणे, जव, कुळपी, हिरवी कडधान्ये, मूग, त्याच प्रमाणे आहारात भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

गुरू (बृहस्पती):

ज्योतिष शास्त्रात गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. जर हा ग्रह बलवान असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. यातून चांगले परिणाम मिळविण्यासाठी हरभरा, हरभरा डाळ, बेसन, मका, केळी, हळद, खडे मीठ, पिवळी कडधान्ये आणि फळांचा समावेश जेवणात करावा.

शुक्र :

शुक्र ग्रह भौतिक सुख, सौंदर्य, ऐश्वर्य, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. यापासून शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी त्रिफळा, मसूर साखर, कमलगट्टा, साखर मिठाई, मुळ्याचे सेवन करावे

शनि :

शनि ग्रह अशुभ असेल तर त्याचा शरीर, मन आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. चांगल्या आयुष्यासाठी शनीची कृपा आवश्यक आहे. यासाठी तीळ, उडीद, काळी मिरी, शेंगदाणा तेल, लोणचे, लवंग, तमालपत्र आणि काळे मीठ यांचे सेवन करावे

राहु आणि केतू :

राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुमच्या आहारात उडीद, तीळ आणि मोहरीचा समावेश करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे. TV9 याची पुष्ठी  करत नाही. 

संबंधित बातम्या :

Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा

Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा

Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.