लवकर कर्जमुक्त व्हायचं, मग फक्त शुक्रवारी करा ‘हे’ सोपे उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा, उपवास आणि उपाय केले जातात. यामुळे व्यक्ती आर्थिक समस्या आणि कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकते. तसेच तुमच्या घरातील सकारात्मकता कायम राहाते.

वास्तूशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यास तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते. आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले जातात. शुक्रवार लक्ष्मी देवीची पूजा केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होते. लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हटले जाते. लक्ष्मी देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते त्यासोबतच आर्थिक चणचण दूर करण्यास मदत होते. शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि बरेच लोक शुक्रवारी उपवास करतात, तर बरेच लोक देवी लक्ष्मीला समर्पित वैभव लक्ष्मीचा उपवास करतात.
अनेकवेळा आपण भरपूर मेहनत करतो परंतु आपल्यावा अपेक्षित फळ मिळत नाही. धार्मिक मान्यतेनुसार, शुक्रवारच्या दिवशी उपवास केल्यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि व्यक्तीवर नेहमीच देवीची कृपा राहते. याशिवाय, या दिवशी काही खात्रीशीर उपाय केल्यास, एखाद्या व्यक्तीच्या पैशाशी संबंधित समस्या सोडवता येतात. तर चला जाणून घेऊया पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते शुक्रवारसाठी काही अचूक उपायांबद्दल.
श्रीसूक्ताचे पठण
शुक्रवार हा लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी योग्य विधींनी लक्ष्मीची पूजा करावी. ज्या व्यक्तीला आयुष्यात धन कमवायचे आहे त्याने देवी लक्ष्मीचा आश्रय घ्यावा, हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा नेहमी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्रीसूक्ताचे पठण करू शकता आणि ११ दिवे लावून तिची पूजा देखील करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल.
लहान मुलींना लक्ष्मीचे रूप मानले पाहिजे. असं म्हणतात की तुम्ही मूर्तीमध्ये स्थापित केलेल्या देवीला प्रसन्न करा किंवा न करा, पण घरातील लहान मुलींना नेहमी आनंदी ठेवावे. लहान मुलींना खाऊ घालून त्यांना आनंदी केले पाहिजे. जेवणानंतर त्यांची पूजा करा आणि त्यांना दक्षिणा द्या. मुलीला पांढरे किंवा गुलाबी कपडे घाला आणि जय माँ लक्ष्मीचा जप करा. असे मानले जाते की या उपायाने देवी लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कशी पूजा कराल?
देवी लक्ष्मीची पूजा विधीने करावी, तिला लाल फुलं, नारळ आणि मिठाई अर्पण करावी. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्त किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करणे फायद्याचे आहे. एकाक्षी नारळ देवी लक्ष्मीला खूप आवडतो, त्यामुळे या दिवशी एकाक्षी नारळ अर्पण केल्यास ती प्रसन्न होते. पांढरा रंग देवी लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणून या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, मैदा, साखर, दूध, दही इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते. या उपायामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. एका तांब्याच्या भांड्यात तांदूळ भरून त्यावर लाल कपडा आणि नारळ ठेवा. या भांड्यात पाणी भरून त्यात सिंदूर आणि तुळस मिक्स करा. या उपायाने लक्ष्मी आकर्षित होते.
जर तुम्हाला बराच काळ पैशाची कमतरता भासत असेल किंवा पैसे तुमच्यासोबत राहत नसतील आणि तुम्ही खूप खर्च करत असाल तर तुम्ही हा उपाय अवलंबू शकता. ज्या चांदीच्या नाण्यावर श्री यंत्र किंवा लक्ष्मीचे चित्र कोरलेले असेल ते लाल किंवा पांढऱ्या कापडात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. या उपायाचा अवलंब केल्याने पैसे वाचतील आणि पैसेही आकर्षित होतील. देवी लक्ष्मीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने ती प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
शुक्रवारी ‘या’ गोष्टी करू नका….
शुक्रवारी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करणे टाळावे, कारण असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी दूखी होते. शुक्रवारी घाणेरडे, फाटलेले किंवा काळे कपडे घालू नयेत, कारण शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानले जाते. शुक्रवारी खूप आवाज करणे टाळावे, कारण असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी नाराज होते. शुक्रवारी राग आणि मत्सर टाळणे आवश्यक आहे, कारण यामुळे लक्ष्मीची कृपा मिळत नाही. या उपायांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला आर्थिक समृद्धी प्राप्त होईल, अशी मान्यता आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.