Festivals of June Month 2022: गंगा दशहरा ते निर्जला एकादशीपर्यंत, जाणून घ्या जून महिन्यातील मुख्य सण उत्सव
जून महिन्याच्या अखेरीस आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे. इतकेच नाही तर जून महिन्यात ग्रहांच्या स्थितीतही असे काही बदल होणार आहेत, जे अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. जूनमध्ये येणार्या प्रमुख उपवास आणि सणांची माहिती इथे जाणून घ्या.
उपवास आणि सणांच्या दृष्टीने जून महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात नारायणाच्या लाडक्या निर्जला एकादशीपासून गंगा दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता सण (Festival) साजरा केला जाईल. जून महिना (June Month 2022) यंदा उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातोय. इंग्रजी कॉलेडरप्रमाणे हा वर्षातील सहावा महिना आहे, जो ज्येष्ठ महिन्याच्या दुसऱ्या तारखेपासून सुरू होत आहे. या महिन्यात रंभा तृतीया, गंगा दशहरा, निर्जला एकादशी, गायत्री जयंती, कबीर जयंती, (Kabir Jayanti) वट पौर्णिमा (Vat Pournima) या दिवशी असे सण आहेत. या महिन्याच्या अखेरीस आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे. इतकेच नाही तर जून महिन्यात ग्रहांच्या स्थितीतही असे काही बदल होणार आहेत, जे अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. जूनमध्ये येणार्या प्रमुख उपवास आणि सणांची यादी येथे जाणून घ्या.
हे जूनचे मुख्य व्रत आणि सण आहेत
02 जून, गुरुवार – रंभ तृतीया
03 जून, शुक्रवार- विनायक चतुर्थी
09 जून, गुरुवार – गंगा दसरा
11 जून, शनिवार – निर्जला एकादशी, गायत्री जयंती
12 जून रविवार – शिवराज्याभिषेकोत्सव
14 जून, मंगळवार – संत कबीर जयंती, वट पौर्णिमा
17 जून, शुक्रवार – संकष्टी चतुर्थी व्रत
24 जून – शुक्रवार – योगिनी एकादशी
27 जून – सोमवार – मासिक शिवरात्री व्रत
28 जून – मंगळवार – दर्शनी अमावस्या
30 जून, गुरुवार – आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे
रंभा तृतीया
गुरुवार, 02 जून रोजी रंभा तृतीया व्रत ठेवण्यात येणार आहे. हे व्रत शुभकार्यासाठी ठेवले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होतो. दुसरीकडे, विवाहित महिलांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
विनायक चतुर्थी
चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. दोन्ही उपवास गणपतीला समर्पित आहेत. विनायक चतुर्थी शुक्रवार, 3 जून रोजी आणि संकष्टी चतुर्थी शुक्रवार, 17 जून रोजी आहे.
गंगा दशहरा
गुरुवार, 09 जून, गंगा दशहरा सण आहे. असे मानले जाते की या दिवशी पृथ्वीवरील मानवांना वाचवण्यासाठी गंगा स्वर्गातून अवतरली होती. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी गंगा मातेची विशेष पूजा केली जाते, त्याचप्रमाणे यादिवशी गंगेत स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.
निर्जला एकादशी
निर्जला एकादशीचे व्रत शनिवार, 11 जून रोजी ठेवण्यात येत आहे. ही एकादशी महाएकादशी मानली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होते. या उपवासात पाणी पिण्यास मनाई आहे. ही एकादशी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. गायत्री जयंतीही याच दिवशी असते. जून महिन्यातील दुसरी एकादशी शुक्रवार, 24 जून रोजी येईल. या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात.
शिवराज्याभिषेकोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. रविवार, 12 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेकोत्सव दिन आहे. यंदा उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात.
कबीर जयंती
कबीर जयंती ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी 14 जून रोजी आहे. कबीर दासांनी ढोंगीपणाविरुद्ध बंड केले, म्हणून त्यांना पहिले विद्रोही संत म्हटले जाते. पौर्णिमा आधारित कॅलेडरनुसार या दिवशी वट सावित्री व्रत ठेवले जाईल. दक्षिण भारतातील बहुतेक राज्यांमध्ये लोक पौर्णिमेच्या दिवशी हा उपवास करतात.
मासिक शिवरात्रीचे व्रत
दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्रीचे व्रत केले जाते. हे व्रत महादेवाला म्हणजेच शिव शंकराला समर्पित आहे. या व्रताने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. या वेळी मासिक शिवरात्री सोमवार, 27 जून रोजी आहे.
(वर दिलेली माहिती ही धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही)