Ganesh Chaturthi 2021 | गणपतीसमोर या मंत्रांचा जप करा, मनातील सर्व मनोकामना होतील पूर्ण
आज गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरु राहतो. असे मानले जाते की याच दिवशी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपतीचा जन्म झाला होता. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.
मुंबई : आज गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरु राहतो. असे मानले जाते की याच दिवशी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपतीचा जन्म झाला होता. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.
यानंतर घरात गणपतीला घरात विराजमान केले जाते. श्रद्धेनुसार लोक 5, 7 किंवा 9 दिवस घरी गणपती बसवतात. या दरम्यान त्यांची खूप सेवा केली जाते. पूजा केली जाते आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण केले जातात. गणपतीच्या पूजेत अक्षतांचे विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी गणेशाला घरी आणले जाते त्यावेळी एक विशेष पूजेचं आयोजन केले जाते.
जर तुम्ही यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती घरात बसवण्याची तयारी करत असाल तर तुमच्या मनोकामनेनुसार चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत या मंत्रांचा जप करा –
1. दीर्घायुष्यासाठी
नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये.
2. विशेष इच्छा पूर्तीसाठी
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश,
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश.
3. धन प्राप्तीसाठी
ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा
4. सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः,
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः,
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः,
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्,
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत् क्वचित्.
5. घरात सुख आणि शांती आणण्यासाठी
ॐ ग्लौं गं गणपतये नम:
6. कौटुंबिक त्रास दूर करण्यासाठी
– ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.
– गं क्षिप्रप्रसादनाय नम: .
7. संपत्ती, विद्या आणि संतान प्राप्तीसाठी
विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम्,
पुत्रार्थी लभते पुत्रान्-मोक्षार्थी लभते गतिम्.
8. तेजस्वी मूल होण्यासाठी हे स्तोत्र वाचा
ॐ नमोस्तु गणनाथाय, सिद्धिबुद्धि युताय च,
सर्व प्रदाय देहाय पुत्र वृद्धि प्रदाय च,
गुरुदराय गरबे गोपुत्रे गुह्यासिताय ते,
गोप्याय गोपिता शेष, भुवनाय चिदात्मने,
विश्व मूलाय भव्याय, विश्व सृष्टि कराय ते,
नमो नमस्ते सत्याय, सत्यपूर्णाय शुंडिने,
एकदंताय शुद्धाय सुमुखाय नमो नम:,
प्रपन्न जन पालाय, प्रणतार्ति विनाशिने,
शरणंभव देवेश संततिं सुदृढ़ां कुरु,
भविष्यंति च ये पुत्रा मत्कुले गणनायक:,
ते सर्वे तव पूजार्थं निरता: स्युर्वरोमत:,
पुत्र प्रदं इदंस्तोत्रं सर्वसिद्धिप्रदायकम.
Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्तhttps://t.co/CgnaY64QXU#GaneshChaturthi2021 #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ganesh Chaturthi 2021 | चॉकलेट, M seal, ते काडीपेटी, लाडक्या बाप्पाची वेगवेगळी रुपं