Ganesh Chaturthi 2021 | जर अजाणतेपणी गणेश चतुर्थीला चंद्र दर्शनाचा दोष लागला तर घाबरु नका, हा महाउपाय करा
रिद्धी-सिद्धीचे दाता गणपती यांचा महापर्व गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून सुरु होणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. गणपतीच्या या पवित्र सणाला, जेव्हा तुम्ही 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषाने आपल्या आराध्यची पूजा कराल तेव्हा तुम्हाला या दिवशी लागणाऱ्या एका दोषापासून स्वत:चा बचाव करावा लागेल.
मुंबई : रिद्धी-सिद्धीचे दाता गणपती यांचा महापर्व गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून सुरु होणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. गणपतीच्या या पवित्र सणाला, जेव्हा तुम्ही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने आपल्या आराध्यची पूजा कराल तेव्हा तुम्हाला या दिवशी लागणाऱ्या एका दोषापासून स्वत:चा बचाव करावा लागेल. असे मानले जाते की गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहू नये कारण या रात्री चंद्र पाहिल्याने एखाद्या व्यक्तीवर भविष्यात खोटे आरोप लागतात.
चंद्रदर्शन का करु नये?
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शनाबाबत एक कथा आहे. त्यानुसार, जेव्हा गणपतीला हत्तीचे शीर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर ते प्रथम पूजनीय म्हटले गेले. तेव्हा त्यांचे सर्व देव आणि देवींनी पूजा केली. पण चंद्रदेवाने तसे केले नाही, कारण त्यांना त्यांच्या सुंदरतेचा अभिमान होता. जेव्हा गणपतीने चंद्रदेवाचा हा अभिमान पाहिला तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तू काळा होशील.
तेव्हा चंद्रदेवला त्याची चूक कळली आणि त्याने गणपतीची माफी मागितली. त्यानंतर गणपतीने चंद्रदेवावर दया केली आणि सांगितले की सूर्याची किरणे त्याच्यावर पडताच त्याची आभा आणि सौंदर्य परत येईल. पण, गणेश चतुर्थीला जो कोणी चंद्र दर्शन करेल त्यावर चोरीचे खोटे आरोप लागतील. तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई करण्यात आली आहे आणि जर कोणी चुकून या दिवशी चंद्र पाहिला तर तो पापाचा दोषी ठरतो.
हा मंत्र चंद्र दर्शनातील दोष दूर करेल
जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीकडून गणेश चतुर्थीला अजाणतेपणी चंद्र दर्शन घडत असेल घाबरु नका. पण ते दूर करण्यासाठी खाली दिलेल्या मंत्राचा पूर्ण भक्ती आणि विश्वासाने जप करा. या मंत्राचा जप केल्याने तुमच्यावर चंद्र दोषाचे दुष्परिणाम होणार नाहीत. हा उपाय त्या लोकांसाठी देखील खूप प्रभावी आहे ज्यांना खोटे आरोप लागले आहेत. अशा व्यक्तीने दिवसातून एकदा या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या प्रभावाने, त्याला लवकरच त्याचा आदर मिळेल.
सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:। सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:।।
Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव कधीपासून, जाणून घ्या गणेश स्थापना आणि पूजेचे नियमhttps://t.co/UFCmX3Zjz1#ganeshafestival #GaneshChaturthi #Ganeshotsav2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :