Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थीला घरी गणेशाची स्थापना का केली जाते, जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिना आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तसेही प्रत्येक महिन्याची चतुर्थी फक्त श्री गणेशाला समर्पित असते. परंतु भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी अत्यंत विशेष मानली जाते. या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाल्याची मान्यता आहे. यावेळी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी येत आहे.
मुंबई : हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिना आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तसेही प्रत्येक महिन्याची चतुर्थी फक्त श्री गणेशाला समर्पित असते. परंतु भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी अत्यंत विशेष मानली जाते. या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाल्याची मान्यता आहे. यावेळी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी येत आहे.
ही गणेश चतुर्थी देशभरात भव्य उत्सव म्हणून साजरी केली जाते. हा उत्सव दहा दिवस चालतो. महाराष्ट्रात या उत्सवाचे वैभव पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे भक्त आपल्या बाप्पाला ढोल-ताशांच्या गजराच घरी आणतात आणि घरात स्थापन करतात. ही स्थापना दीड, 5, 7, 9 किंवा पूर्ण 10 दिवसांची असते. या दिवसांमध्ये गणपती भक्त त्यांची सेवा करतात. त्यांचे आवडते नेवैद्या त्यांना अर्पण केले जाते. पूजा आणि कीर्तन केले जाते. त्यानंतर 10 व्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. आज आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना ते विसर्जनामागील श्रद्धा जाणून घेऊया –
पौराणिक कथा काय?
धार्मिक ग्रंथांनुसार, महाभारताची रचना महर्षि वेद व्यास यांनी केली होती. परंतु ते लिहिण्याचे काम गणपतीजींनी पूर्ण केले. या लेखनाचे काम पूर्ण 10 दिवस चालले. त्या काळात गणपतीने अहोरात्र हे काम केले. कामाच्या वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी महर्षी वेद व्यासजींनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला होता.
महाभारत लिहिण्याचे हे कार्य चतुर्थीच्या दिवशी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर, वेद व्यासजींनी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली. पण काम करत असताना गणपती खूप थकले होते आणि लेप कोरडे झाल्यामुळे त्याचे शरीर अकडले होते आणि त्यांच्या शरीराचे तापमान देखील वाढले होते. माती सुकू लागली होती आणि पडू लागली होती.
यानंतर, वेद व्यासजींनी त्यांना त्यांच्या झोपडीत ठेवून त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी त्यांचे सर्व आवडते पदार्थ दिले आणि त्यांचे शरीर थंड करण्यासाठी त्यांचे तलावात विसर्जित केले. तेव्हापासून चतुर्थीच्या दिवशी गणपती घरी आणण्याची प्रथा सुरु झाली, अशी मान्यता आहे.
चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त बाप्पाला घरी घेऊन येतात. त्यांची सेवा करतात. त्याच्या आवडीचे पदार्थ त्यांना अर्पण केले जातात आणि त्यानंतर त्यांच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते.
Lord Ganesha | प्रत्येक विघ्नाचे हरण करते संकटनाशक गणेश स्तोत्र, बुधवारी अवश्य करावे पठणhttps://t.co/PrbdmGrDpq#SankashtiChaturthi #GaneshPuja #SankatnashanGanpatiStotra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ganesh Utsav 2021 : मोठे कान असो किंवा लांब सोंड, गणपतीच्या प्रत्येक गोष्टीतून मिळते चांगली शिकवण