Pune Ganesh Chaturthi | पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी जाताय, पार्किंगसाठी दिली 26 ठिकाणे

| Updated on: Sep 19, 2023 | 10:20 AM

GANESH CHATURTHI 2023 | राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्सव सुरु झाला आहे. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात गणरायाच्या आगमानाची तयारी केली जात आहे. आता दहा दिवस गणरायाच्या दर्शनासाठी भाविक जाणार आहे. त्यासाठी व्यवस्था केली गेली आहे.

Pune Ganesh Chaturthi | पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी जाताय, पार्किंगसाठी दिली 26 ठिकाणे
Pune
Follow us on

पुणे | 19 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसाच्या आगमनासोबत गणरायाचे आगमन धुमधडाक्यात होत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका पुणे शहरात निघाल्या आहेत. पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाईGANESH CHATURTHI 2023, मानाचा पहिला कसबा गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. आता दहा दिवस भाविक आरास पाहण्यासाठी येणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे पार्किंगची व्यवस्था पोलिसांनी दिली आहे.

26 पार्किंगचे स्थळ

वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय कुमार यांनी सांगितले की, दहा दिवस भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी 26 पार्किंगचे ठिकाणे निश्चित केली आहेत. अनेक भाविक आपले चार चाकी वाहन आणि दुचाकी वाहन आणतात. त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा केली गेली आहे. यामुळे भाविक या ठिकाणी वाहन लावून गणेश उत्सव पाहण्यासाठी जाऊ शकतात. भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन आपले वाहन पार्क करावे, असे आवाहन विजय कुमार यांनी केले आहे.ganesh chaGANESH CHATURTHI 2023

ही रस्ते असणार बंद

पुणे शहरातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, बगाडे रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरुनानक रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या पार्किंगला बंदी असणार आहे. कुमठेकर रोड, सदाशेव पेठ, फडके हौद रोड, नाईक रोड, एमजी रोडवरील एकेरी वाहतूक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी 5 वाजल्यापासून बंद राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

या रस्तांवरील वाहतूक वळवली

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. आता बर्वे चौक-अलका चौक-टिळक रोड-स्वारगेट या मार्गाने जाता येणार आहे. तसेच पीएमपीएमएल बसेसचा मार्ग बदला गेला आहे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर वाहनांच्या ये-जा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिजामाता चौक ते रामेश्वर चौक, मंडई ते शनिपार चौक, सेवासदन चौक- आप्पा बळवंत चौक- बुधवार चौक या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.