Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Festival: या गणरायाचा शृंगार 70 किलो सोने आणि 300 किलो चांदीचा, मंडळाने उतरवला आहे 316.40 कोटींचा विमा

मुंबईत 12 हजार सार्वजनिक मंडळे आहेत. तर घरात स्थापना होणाऱ्या गणेशांची संख्या तर लाखांच्या घरात आहे. मुंबईत किंग सर्कलचा जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो

Ganesh Festival: या गणरायाचा शृंगार 70 किलो सोने आणि 300 किलो चांदीचा, मंडळाने उतरवला आहे 316.40 कोटींचा विमा
मुंबईचा श्रीमंत गणेशImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 9:22 PM

मुंबई- राज्यात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतोय. कोरोनाच्या दोन वर्षांत असलेल्या बंदीनंतर यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav)धामधुमीत साजरा करण्यात य़ेणार आहे. मुंबईसह (Mumbai)कोकणात आणि राज्यभरात पुढचे 10 दिवस गणेशोत्सवाचा आनंद घराघरात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गल्लीत असलेल्या सार्वजनिक मंडळातही  हा उत्साह दिसेल. या मंडपांवर त्यातील रोषणाई आणि डेकोरेशन (decoration), चलत चित्रांवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी केला जोता. त्याचमुळे यंदा अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या मंडपांचा विमा काढल्याची माहिती आहे. यावर्षी गणेश मंडळांनी कोट्यवधी रुपयांचा विमा उतरवलेला आहे.

मुंबईत 12 हजार सार्वजनिक मंडळे आहेत. तर घरात स्थापना होणाऱ्या गणेशांची संख्या तर लाखांच्या घरात आहे. मुंबईत किंग सर्कलचा जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार या गणपतीला यावर्षी 70 किलो सोने आणि 300 किलो चांदीच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात येणार आहे. या गणएश मंडळाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवला असल्याची माहिती आहे.

गणेश मंडपासाठी 31.97 कोटींचा विमा

मुंबईच्या किंग सर्कलच्या जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामत यांमी सांगितले की, गणेशोत्सवासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपीनकडून मंडळाने विमा घेतला आहे. येणाऱ्या सगळ्या भक्तांचाही विमा काढण्यात येणार आहे. यात 31.97 कोटी रुपयांचा विमा सोन्याच्या आणि चांदींच्या दागिन्यांचा आहे. तर 263 कोटी रुपयांचा विमा हा सुरक्षारक्षक, पुजारी, स्वयंसेवकांसाठी काढण्यात आलेला आहे.

हे सुद्धा वाचा

भक्तांसाठी 20 कोटी रुपयांचा विमा

जीएसबी सेवा मंडळाने भूकंपाचा धोका कव्हर करण्यासाठी, तसेच फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, भांडी, किराणा, फळे, भाज्या या सामानांचाही विमा करण्यात आलेला आहे. मंडप आणि भक्तांसाठी 20कोटी रुपयांचा विमा कव्हर घेण्यात आला आहे.

'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा
'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.