Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाचं विसर्जन, फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, नागरिकांसाठी विसर्जन लाईव्ह दाखवणार
लालबागच्या राजाचं आज विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी उत्तर आरती होणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजताच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे. दरवर्षी ज्या मार्गावरुन लालबागचा राजा विसर्जना करता निघतो तोच मार्ग यावर्षी सुद्धा असणार आहे.
मुंबई : आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होणार आहे.
मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचंही आज विसर्जन होणार आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदा भव्य मिरवणूक काढली जाणार नाही. तरी गणेशभक्तांनी राजाच्या विसर्जनादरम्यान रस्त्यावर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लालबागच्या राजाचं आज विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी उत्तर आरती होणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजताच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे. दरवर्षी ज्या मार्गावरुन लालबागचा राजा विसर्जना करता निघतो तोच मार्ग यावर्षी सुद्धा असणार आहे. पण, फक्त मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांसोबत लालबागचा राजा विसर्जनासाठी निघणार आहे. मंडळाचं आवाहन आहे की लोकांनी गर्दी करु नये.
हा विसर्जन सोहळा हा सोशल मीडिया माध्यमांवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांकडून आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-
सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी
अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी
गणेश विसर्जन 2021 ची पद्धत
– गणपतीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांना नवीन कपडे घाला, फुलांच्या माळेने त्यांना सजवा.
– एक रेशमी वस्त्र घ्या आणि त्यात मोदक, दुर्वा, सुपारी आणि पैसे बांधा
– ही बांधलेली शिदोरी गणपतीच्या मूर्तीसोबत ठेवा.
– गणपतीची पूजा करा, आरती करा आणि कळत नकळत घडलेल्या सर्व चुकांची क्षमा मागा
– जलकुंडाजवळ पोहोचल्यानंतर गणेशाची आरती करा, त्यानंतर पश्चिम दिशेला बांधलेल्या रेशीम कापडाच्या शिदोरीसह मूर्तीचे विसर्जन करा.
Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…https://t.co/zorDRGs3mA#Ganeshotsav #GaneshVisarjan #AnantChaturdashi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
संबंधित बातम्या :
अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा
Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार