Ganesh Visarjan 2021 Live Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानच्या बाप्पाचं विसर्जन
anant chaturdashi ganesh visarjan 2021 Live | प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.
मुंबई : प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-
? सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
? दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
? संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
? रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
? सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
? अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी
? अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी
राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदामात्र गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. त्यासाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न
भाजप नेते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
यथाशक्ती पुजा-आर्चा, सेवा करुन आज आमच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाला जड अंतकरणाने आम्ही निरोप दिला… अर्थात पुढच्या वर्षी लवकर या… सर्वांचे रक्षण कर.. अशा प्रार्थना करीतच.. #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya pic.twitter.com/sDgoqJkMKG
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 19, 2021
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानच्या बाप्पाचं विसर्जन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानच्या बाप्पाचं विसर्जन
Ganpati immersion at the official residence of Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, in Mumbai. pic.twitter.com/9C988qvzUa
— ANI (@ANI) September 19, 2021
-
-
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही विसर्जन
पुणे :
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनानंतर संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले अन विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मंदिरातच गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीला बंदी असताना केवळ तुळशीबाग गणपतीने मिरवणूक काढली. हा अपवाद वगळता पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. यासाठी पोलिसांनी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.
-
जळगावात गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी
जळगाव – गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी
जळगाव तालुक्यातील आव्हाने येथे गिरणा नदी पात्रात गणपती बाप्पाचे विसर्जन
कोरोना नियमांचा फज्जा, प्रशासनाचे दुर्लक्ष
लहान मुले देखील पाण्यात गणपती विसर्जनासाठी गिरणा नदी पात्रात उतरली
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात
पुणे :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात
मंदिरात गणेशनामाचा जयघोष सुरु
याही वर्षी मंदिरातच होणार बाप्पाचे विसर्जन
-
-
नागपूरच्या फुटाळा तलाववर विसर्जनासाठी मोठे गणपती यायला सुरुवात
नागपूर :
नागपूरच्या फुटाळा तलाववर विसर्जनासाठी मोठे गणपती यायला सुरुवात
महापौर दया शंकर तिवारी यांनी विसर्जन व्यवस्थेचा घेतला आढावा
नागपूरकर नियमांचं पालन करून कृत्रिम तलावात विसर्जन करत आहे
त्यामुळे नागपूरच्या जनतेचे मानले आभार
घरगुती आणि मोठ्या गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जन
-
हैदराबादेत गणेश विसर्जनासाठी भाविकांची तुफान गर्दी
तेलंगणातही गणेशोत्सवाचा उत्साह, विसर्जनाला मोठी गर्दी, हैदराबादेत गणेश विसर्जनासाठी भाविकांची तुफान गर्दी
Telangana | A large number of people arrive in Hyderabad for the immersion of Khairatabad Ganesh
“Over 20,000 police personnel have been deployed to ensure smooth Ganesh Nimajjanam,” says Shikha Goel, ACP (Crime and SIT), Hyderabad Police pic.twitter.com/TwHCMqBh89
— ANI (@ANI) September 19, 2021
-
घरगुती गणपती विसर्जनासाठी नाशिकच्या गोदातीरी गणेश भक्तांची तुफान गर्दी
नाशिक :
– घरगुती गणपती विसर्जनासाठी नाशिकच्या गोदातीरी गणेश भक्तांची तुफान गर्दी – कोरोनाचे नियम विसरून भक्त आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गोदातीरावर – प्रशासनाकडून गणेश भक्तांना गर्दी न करण्याच आवाहन
-
लालबागचा राजा विसर्जन सोहळा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मुंबईतील मानाचा लालबागचा राजा गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना जगभरावर असलेला कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर होऊ दे, अशी मनोमन सर्व भाविकांनी प्रार्थना आपल्या बाप्पाकडे केली. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमली होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीला सावरण्यासाठी मुंबई पोलिसांची देखील कसोटी लागली. या विसर्जन सोहळावेळी सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
-
लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही भाविकांची मोठी गर्दी
Maharashtra: Scores of people show up at immersion of Mumbai’s ‘Lalbaugcha Raja’ amid heavy police presence.#GaneshChaturthi pic.twitter.com/3XBRMZXmaL
— ANI (@ANI) September 19, 2021
-
नागपुरात दुपारनंतर बाप्पाच्या विसर्जनाला वेग
नागपूर –
नागपुरात दुपारनंतर बाप्पाच्या विसर्जनाला वेग
शहरातील तलावात विसर्जनाला बंदी असल्याने कृत्रिम तलावात विसर्जन
शहराच्या वेगवेगळ्या भागात 248 कृत्रिम तलाव करण्यात आल्याने एका ठिकाणी गर्दी होत नाही
पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त
साधेपणाने होत आहे विसर्जन
-
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
थोड्याच वेळात विसर्जन
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
10 जणांच्या उपस्थितीत विसर्जन होणार
गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
-
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूक, कोरोनाच्या सावटामुळे कमी भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाची विसर्जन मिरवणूक
-
चिंचपोकळीचा चिंतामणिची अखेरची मानाची आरती सुरु
– चिंचपोकळीचा चिंतामणिची आरती सुरु झालीये, अखेरची मानाची आरती सुरु
– या वर्षी कोरोना नियमांचं पालन करत मंडळाकडून एक फुटी चांदिच्या मुर्तीची स्थापना…
– आरतीसाठी मंडपाबाहेर मोठी गर्दी
– यंदा वाॅल्वो बसमधून चिंतामणी होणार मार्गस्थ
-
नागपूरच्या राजाला देण्यात आला भावपूर्ण निरोप, राजाचं कोराडी नदीत करण्यात आलं विसर्जन
नागपूरच्या राजाला देण्यात आला भावपूर्ण निरोप
राजाचे कोराडी नदीत करण्यात आलं विसर्जन
क्रेन च्या साहाय्याने बाप्पा च विसर्जन करण्यात आलं.
-
लालबाग राजाची एक झलक मिळवण्यासाठी भक्तांची आसपासच्या पुलांवर गर्दी
– लालबाग राजाची एक झलक मिळवण्यासाठी भक्तांची आसपासच्या पुलांवर गर्दी
– भायखळा परिसरात पोहोचला राजा
– राजाची अखेरची झलक मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली जात आहेत
– लोक हात जोडून मागणं मागत आहेत
-
नाशिकच्या मानाच्या चांदीच्या गणपतीचं विसर्जन
– नाशिकच्या मानाच्या चांदीच्या गणपतीचं विसर्जन
– मंदिर परिसरातच कृत्रिम तलावात केलं विसर्जन
– अभिनेता चिन्मय उदगिरकर यांच्या हस्ते केलं मंदिर परिसरात विसर्जन
– परिसरातून पालखीतून मिरवणूक काढूत दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप
-
तुळशीबाग मिरवणुकीत सहभागी झालेले कार्यकर्ते नव्हते, बाहेरुन आलेले नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले – विकास पवार
पुणे
तुळशीबाग मिरवणुकीत सहभागी झालेले कार्यकर्ते नव्हते
बाहेरून आलेले नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले,
आमचे 50 चं कार्यकर्ते होते आणि त्याची यादी पोलीस प्रशासनाला दिली होती,
आमच्यावर पोलीस कारवाई करणार नाहीत,
आम्ही काय चूकीचं केलं नाही मंडळाचं स्पष्टीकरण,
मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांची माहिती,
-
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मंडळ मंडळाजवळ तयार करण्यात आलेल्या हौदात विसर्जन
पुणे
फुलांनी सजवलेल्या पालखीमधून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मंडळ मंडळाजवळ तयार करण्यात आलेल्या हौदात विसर्जन
1 वाजून 18 मिनिटांनी विसर्जन झाले
-
तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळा, पोलिसांची कारवाई
तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळा
सोहळ्यादरम्यान पुण्यात पोलिसांची कारवाई
नियम डावलून विसर्जन
परवानगी नसताना मिरवणूक काढल्याने कारवाई
पोलिसांकडून पथकाचे ढोल-ताशे जप्त
-
पुण्यातील मनाच्या पाचवा गणपती केसरीवाडा गणपती थोड्याच वेळात होणार श्रींचे विसर्जन
पुणे
-पुण्यातील मनाच्या पाचवा गणपती केसरीवाडा गणपती थोड्याच वेळात होणार श्रीचे विसर्जन…
-महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार श्रींची आरती…
-आमदार मुक्ता टिळक,लोकमान्य टिळकांचे पंतू दीपक टिळक, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, रोहित टिळक उपस्थित
-आकर्षक रांगोळीच्या पायघड्या…
-
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग थोड्या वेळात होणार विसर्जित
पुणे –
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग थोड्या वेळात होणार विसर्जित,
ढोल ताशांच्या गजरात देणार बाप्पाला निरोप,
उत्सवमूर्ती पालखीत विराजमान,
थोड्या वेळात होणार विसर्जन
-
लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागच्या राजाची एक झलक पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन
-
जळगावात गणेशोत्सवात बँड वाल्यांवर उपासमारीची वेळ
जळगाव – जळगावात गणेशोत्सवात बँड वाल्यांवर उपासमारीची वेळ
मिरवणुका बंद असल्याने 200 ढोल पथक, बँड पथक रिकामे
टॉवर चौकात बँड वाले कामाच्या प्रतीक्षेत
-
औरंगाबाद संस्थान गणपती गणेशाचे मान्यवरांच्या हस्ते विसर्जन होत आहे
औरंगाबाद :
औरंगाबाद संस्थान गणपती गणेशाचे मान्यवरांच्या हस्ते विसर्जन होत आहे
मंदिरासमोर बनवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन होत आहे.
-
जळगाव मनपाच्या मानाचा गणपतीला दिला निरोप
जळगाव –
जळगाव मनपाच्या मानाचा गणपतीला दिला निरोप
महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाली आरती करून दिला निरोप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची होती उपस्थिती
-
पुणेकरांचं ग्रामदैवत पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे पर्यावरण पूरक हौदात विसर्जन
– पुणेकरांचं ग्रामदैवत पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे पर्यावरण पूरक हौदात विसर्जन
– ११:२९ मिनिटांनी कसबा गणपतीचे विसर्जन
-
मुंबईचा राजा नायर रुग्णालय परिसरात पोहोचला
– मुंबईचा राजा नायर रुग्णालय परिसरात पोहोचला
– सोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
– गर्दी करु नये असं वारंवार आवाहन
– मंडळाच्या गर्दी करणार्या भक्तांना पोलिसांनी अडवून मागे परत पाठवलं
-
थोड्याच वेळात लालवागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार
थोड्याच वेळात लालवागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार
कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, गुलाल उधळला जात आहे
-
मुंबईच्या राजाची मिरवणूक पोलिसांनी अडवली
मुंबईच्या राजाची मिरवणूक अडवली
मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीत मोठी गर्दी
त्यामुळे पोलिसांनी बाप्पांची मिरवणूक अडवली
गर्दी न करण्याचं पोलिसांचं आवाहन
-
शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपती विसर्जनासाठी थोड्याच वेळात बाहेर पडणार
कोल्हापूर
शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपती विसर्जनासाठी थोड्याच वेळात बाहेर पडणार
शिवाजी तरुण मंडळाने पहाटेच शिवाजी चौकात आणून ठेवली 21 फुटी गणेशमूर्ती
मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत मूर्ती गणेश विसर्जनासाठी न्यायला प्रशासनाने दिली परवानगी
मात्र शिवाजी चौकात झाले जमा
-
लालबागच्या राजाचं विसर्जन, फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, नागरिकांसाठी विसर्जन लाईव्ह दाखवणार
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाचं विसर्जन, फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, नागरिकांसाठी विसर्जन लाईव्ह दाखवणारhttps://t.co/1V3TZ2yKOe#LalbaugchaRaja #Ganeshotsav2021 #GaneshVisarjan
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
-
100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी
दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारीhttps://t.co/nJ7lyApm1f#MumbaiGaneshotsav #GaneshVisarjan #MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
-
कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
– कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
– सभामंडपाच्या समोर छोटेखानी मिरवणूक सुरू असणार आहे
– बाप्पाला पालखीत बसवून वाजत गाजत मिरवणूक काढली जातेय
– मंडळाचे मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक
-
लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात
लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात
आरतीनंतर विसर्जनासाठी बाप्पा मार्गस्थ होणार
-
नागपूरच्या राज्याच्या विसर्जनाला सुरुवात
नागपूरच्या राज्याच्या विसर्जनाला सुरुवात
नागपूर आराध्य दैवत समजलं जाणार्या बाप्पा ला दिला जाणार निरोप
विधिवत पूजा करून साध्या पद्धतीने होणार बाप्पा च विसर्जन
मोजक्या लोकांची उपस्थिती
-
बांधिलकी टिकवत अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला, सहकार्यबद्दल धन्यवाद – महापौर
पुणे –
– सामाजिक भान जपत, बांधिलकी टिकवत अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला, सहकार्यबद्दल धन्यवाद, सर्वांचे कौतुक केले पाहिजे,
– याचं अनुकरण राज्यात केलं गेलं,
– घराचा गणपती घरीच विसर्जित करण्याचे आवाहन केलं त्यानुसार पुणेकरांनी बाप्पाचे घरीच विसर्जन सुरू आहे
-
इतिहासात पहिल्यांदाच महापौरांच्या हस्ते कसबा गणपतीची उत्तरपूजा करण्यात आली
इतिहासात पहिल्यांदाच महापौरांच्या हस्ते कसबा गणपतीची उत्तरपूजा करण्यात आली
129 वर्षात पहिल्यांदा महापौरांनी उत्तरपूजा केलीय
-
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघाला
-
कोल्हापुरातील पहिला मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीच थोड्याच वेळात होणार विसर्जन
कोल्हापूर :
कोल्हापुरातील पहिला मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीच थोड्याच वेळात होणार विसर्जन
पालकमंत्री सतेज पाटील उपस्थितीत राहणार
मंडळाच्या आवारात तयार केलेल्या कृत्रिम कुंडात केल जाणार विसर्जन
फुलांचा सडा आणि रांगोळी ने सजलेल्या मार्गावर निघणार पालखी
-
महापौर मुरलीधर मोहोळ कसबा गणपतीच्या दर्शनासाठी
– महापौर मुरलीधर मोहोळ कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आलेत,
– महापौरांच्या हस्ते आरती होणार
-
नागपूरच्या राज्याच्या विसर्जनाची तयारी सुरु
नागपूर –
नागपूरच्या राज्याच्या विसर्जनाची तयारी सुरु
नागपूर आराध्य दैवत समजलं जाणार्या बाप्पा ला दिला जाणार निरोप
विधिवत पूजा करून साध्या पद्धतीने होणार बाप्पा च विसर्जन
मोजक्या लोकांची उपस्थिती
-
यंदा मानाच्या पाच गणपतींच उत्सवमंडपासमोरचं होणार विसर्जन
पुणे
यंदा मानाच्या पाच गणपतींच उत्सवमंडपासमोरचं होणार विसर्जन,
सकाळी 11 वाजता कसबा गणपतीच्या विसर्जनानंतर मानाचे चारही गणपती होणार विसर्जित,
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन हौदाला आकर्षक फुलांची सजावट,
फुलांची केलेली सजावट येणाऱ्या भक्तांच लक्ष वेधून घेतीये,
मानाच्या गणपतींची विसर्जन तयारी पुर्ण,
मानाचा तिसरा गणपती 12.45 ला होणार विसर्जित,
-
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
नाशिक – देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
भाविकांनी विसर्जनाला जाताना गर्दी करू नये असं आवाहन..
कृत्रिम तलावांचा जास्तीत जास्त वापर करण्याच देखील आवाहन
राजकीय विषयांवर बोलण्यास मात्र नकार
देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना
-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील गणेश मंडळांना भेटी
पुणे –
– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील गणेश मंडळांना भेटी
– मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीपासून भेटीला सुरुवात करणार
– थोड्याच वेळात चंद्रकांत पाटील येणार
-
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त
– गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त
– शहरात ठिकठिकाणी चार हजार पोलीसांचा बंदोबस्त
– राज्य राखीव दलाची तुकडी आणि एक हजार होमगार्ड असणार तैनात
– शहरात 65 संवेदनशील स्थळे, सर्व ठिकाणी पोलीसांचा फिक्स पॅाइंट
– सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन
-
नागपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी 250 कृत्रिम तलाव
– नागपुरात बाप्पाच्या विसर्जनाची तयारी
– नैसर्गिक तलावात विसर्जनावर बंदी
– बाप्पाच्या विसर्जनासाठी 250 कृत्रिम तलाव
– शहरात 450 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
– विसर्जन मिरवणुकीवर बंदी
-
पिंपळगाव बसवंत येथे कादवा नदीवर गणपती विसर्जनास बंदी
निफाड
– पिंपळगाव बसवंत येथे कादवा नदीवर गणपती विसर्जनास बंदी
– पाच कृत्रिम तलावात भक्तांनी आपले गणपती विसर्जन करण्याचे
– गेल्यावर्षी ग्रामपालिका कर्मचाऱ्याचा गणपती विसर्जन करतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय
-
गणेश विसर्जनासाठी नाशिक शहरात 27 नैसर्गिक तर 43 कृत्रिम तलाव
नाशिक – लाडक्या बाप्पाला आज निरोप
गणेश विसर्जनासाठी शहरात 27 नैसर्गिक तर 43 कृत्रिम तलाव
विसर्जनासाठी विभागनिहाय केंद्र तयार
सोमेश्वर धबधब्यावर बचाव पथक तैनात
-
नागपुरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात
– नागपुरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात
– फुटाळा तलाव परिसरात विसर्जन
– मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन
– नागपूरात कोरोनाचे नियम पाळत विसर्जन
-
आज दिवसभर पुणे शहरातील दूकानं राहणार बंद
पुणे
आज दिवसभर पुणे शहरातील दूकानं राहणार बंद
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय,
बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आज दिवसभर वाहतूकीसाठी राहणार बंद,
पोलीसांनी ठिकठिकाणी केलं बँरीकेटींग,
शहरात आज 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त असणार तैनात,
शहरात सकाळपासूनच शांतता,
दूकानं सकाळी 7 ते रात्री विसर्जनापर्यंत राहणार बंद
-
कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात गणरायाच्या मिरावणुकीवर निर्बंध
बुलडाणा
कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गणरायाच्या मिरावणुकीवर निर्बंध
तर विसर्जनाला ही 5 लोकांच्या च उपस्थितीची मर्यादा घातल्या आहेत,
बुलडाणा नगर पालिकेने 23 वाहनांची निर्मल्यासाठी व्यवस्था केलीय, तर तलावाच्या ठिकाणी बेरिकेडट्स लावले आहेत,
नियमांचे पालन करण्याचे नगर पालिकेकडून आवाहन
-
विसर्जनासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद
पुणे –
– विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद,
– सकाळी सात वाजल्यापासून ते प्रमुख व मानाच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत रस्ते बंद असतील,
– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर, कुमठेकर रस्ताही वाहतुकीसाठी बंद.
-
सोलापूर शहरातील दोन्ही गणेश विसर्जन कुंडावर महानगरपालिकेने घातली बंदी
सोलापूर शहरातील दोन्ही गणेश विसर्जन कुंडावर महानगरपालिकेने घातली बंदी
विसर्जन कुंड परिसरात शुकशुकाट
महानगरपालिकेने केली पर्यायी व्यवस्था
पालिका करणार गणपती मूर्तीचे संकलन
Published On - Sep 19,2021 7:16 AM