Ganeshotsav 2021 | सोलपुरात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेला मजूर गेला वाहून

| Updated on: Sep 12, 2021 | 3:03 PM

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात आणि सकाळी, संध्याकाळी त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 9 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. 

Ganeshotsav 2021 | सोलपुरात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेला मजूर गेला वाहून
artificial ganesh immersion

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात आणि सकाळी, संध्याकाळी त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 9 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या दुःखाचा अंत होतो.

दीड दिवस गणपती विसर्जन मुहूर्त

सकाळी – 12.20 ते 01.55 मिनिटे

दुपारी – 03.31 ते 5.06 मिनिटे

संध्याकाळी – 08.6 ते 09.31 मिनिटे

रात्री – 10.56 ते 3.10 (मध्यरात्री, 04 सप्टेंबर)

यावर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्तही जाणून घ्या-

सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत

दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46

रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Sep 2021 07:11 PM (IST)

    सोलपुरात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेला मजूर गेला वाहून

    सोलापूर – दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्यासाठी  गेलेला मजूर गेला वाहून

    मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टी बंधाऱ्यात गेला वाहून

    आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेला होता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी

    वडवळच्या रेल्वे स्लीपर कारखान्यात करत होता काम

    कोळेगाव येथील कोळी बांधव आणि पोलीस प्रशासन घेत आहेत शोध

  • 11 Sep 2021 02:59 PM (IST)

    वसई-विरार-नालासोपाऱ्यात दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात

    वसई-विरार-नालासोपाऱ्यात दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात

    वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आपल्या पोलिसी रितिरिवाजाने गणरायाला सशस्त्रधारी सलामी देऊन, विसर्जनासाठी घेऊन गेले

    पोलीस ठाण्यातील बाप्पाच्या विसर्जनानंतर पोलीस पुन्हा आपल्या विसर्जन स्थळावर बंदोबस्तासाठी तैनात होणार आहेत

  • 11 Sep 2021 11:12 AM (IST)

    यंदा मैदानात विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती

    – मुंबईत आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन

    – यंदा मैदानात विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती

    – विसर्जनासाठी सकाळपासूनच भव्य स्टेज आणि जंतू नाशकाची फवारणी सुरु

    – पवई तलावाचा लोड कमी करण्यासाठी यंदा आसपासच्या परिसरात मैदानातच कृत्रीम तलावांची मनपाकडून निर्मिती…

  • 11 Sep 2021 10:34 AM (IST)

    दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त

  • 11 Sep 2021 10:31 AM (IST)

    आज होणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पुणे पालिकेची तयारी पूर्ण

    आज होणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पुणे पालिकेची तयारी पूर्ण

    दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहरात १९० फिरते हौद असणार

    तर २४७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आलीये

    नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे यासाठी सुमारे १९० मेट्रीक टन अमोनिअम बायकार्बोनेटचे वितरण ही महापालिकेने केलयं

Published On - Sep 11,2021 8:03 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.