AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganga Saptami 2021 | गंगा सप्तमी, जाणून घ्या याचं महत्त्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि कथा

दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) साजरी केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो.

Ganga Saptami 2021 | गंगा सप्तमी, जाणून घ्या याचं महत्त्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि कथा
Ganga
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 2:33 PM

मुंबई : दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) साजरी केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी, देवी गंगाचा जन्म झाला होता आणि त्या स्वर्गातून भगवान शिवच्या जटांमध्ये विराजमान झाल्या होत्या. म्हणून हा दिवस गंगा जयंती आणि गंगा सप्तमी या नावाने ओळखला जातो. या दिवशी गंगा स्नान आणि पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावेळी गंगा सप्तमी 18 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या (Ganga Saptami 2021 Know The Date Importance Puja Vidhi And Katha).

गंगा सप्तमी तिथी प्रारंभ : 12 मे 2021 दुपारी 12:32 वाजता

गंगा सप्तमी तिथी समाप्त : 19 मे 2021 दुपारी 12:50 पर्यंत

गंगा सप्तमीचे महत्त्व

मान्यता आहे की गंगा जयंतीच्या दिवशी देवी गंगेची पूजा करणे आणि गंगा स्नान केल्याने पापांचा नाश होतो, किर्ती आणि आदर वाढतो. याशिवाय, जे लोक मंगल दोषाने ग्रस्त आहेत त्यांना गंगा देवीच्या पूजेचा विशेष फायदा होतो. यावेळी गंगा जयंती मंगळवारच्या दिवशी येत आहे, अशा परिस्थितीत मंगल दोष ग्रस्त लोकांसाठी या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी दान करण्याचंही विशेष महत्त्व आहे. पूजा करुन, गरजूंना दान केल्याने जीवनातील त्रास दूर होतात.

घरीच अशाप्रकारे पूजा करा

जर गंगा स्नान करणे शक्य नसेल, तर घरी गंगा जलचे काही थेंब स्वत:वर शिंपडा किंवा पाण्यात गंगा जल मिसळून स्नान करा. यानंतर देवी गंगेच्या मूर्तीची पूजा करावी किंवा महादेवाची पूजा करावी. त्यांना चंदन, फुले, नैवेद्य, अक्षता, दक्षिणा इत्यादी अर्पण करा. श्रीगंगासहस्रनामस्तोत्रम याचं पठण करा आणि ‘ॐ नमो भगवति हिलि हिलि मिलि मिलि गंगे माँ पावय पावय स्वाहा’ या मंत्राचा जप करा.

भगीरथाच्या प्रयत्नांनी पृथ्वीवर अवतरतीत झाली होती गंगा

पुराणानुसार, गंगा देवी भगवान विष्णूच्या अंगठ्यातून निघाली होती. राजा सगर यांच्या 60,000 पुत्रांच्या राखेचा उद्धार करण्यासाठी त्या पृथ्वीवर आल्या. राजा सगरचे वंशज भागीरथाने कठोर तपश्चर्येनंतर गंगेला पृथ्वीवर घेऊन आले, म्हणूनच देवी गंगाला भागीरथी देखील म्हटले जाते. गंगेच्या स्पर्शाने सगरच्या 60 हजार पुत्रांचा उद्धार झाला होता.

देवी गंगेच्या उत्पत्तीची कहाणी

देवी गंगेच्या उत्पत्तीविषयी बर्‍याच कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, भगवान विष्णूच्या पायाच्या घामाच्या थेंबातून गंगेचा जन्म झाला होता. या कथेनुसार, जेव्हा भगवान शिव यांनी नारद मुनी, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यासमोर गाणे गायले तेव्हा भगवान विष्णूचा घाम वाहू लागला, ज्याला ब्रह्माजींनी त्यांच्या कमंडलात भरले. या कमांडलच्या पाण्यातून गंगेचा जन्म झाला.

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, एकदा गंगा तिव्र गतीने प्रवाहित होत होती. त्यावेळी, जह्नू ऋषी परमेश्वराच्या ध्यानात विलीन होते आणि त्यांचं कमंडल आणि इतर वस्तूही तिथेच ठेवलेल्या होत्या. ज्यावेळी गंगाजी ऋषी जह्नू यांच्याजवळून प्रवाहित झाल्या तेव्हा त्यांचे कमंडल आणि इतर वस्तू आपल्यासमवेत नेल्या. जह्नू ऋषीचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी आपले सामान न दिसल्याने ते क्रोधित झाले.

त्यांचा क्रोध इतका होता की त्यांनी रागाच्या भरात संपूर्ण गंगा प्यायली. त्यानंतर भागीरथ ऋषींनी जह्नू ऋषींकडे गंगेला मुक्त करण्याची विनंती केली. जह्नू ऋषींने भागीरथ ऋषींची विनंती मान्य केली आणि गंगा त्यांच्या कानातून बाहेर निघाली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी गंगा सप्तमी होती.

Ganga Saptami 2021 Know The Date Importance Puja Vidhi And Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Vishnu | वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा, ‘या’ मंत्राचा जप करा

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान करा, घरात समृद्धी नांदेल

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.