Garud Puran : आयुष्यात असेत तणाव तर अवश्य पाळा गरूड पूराणातले हे नियम
गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणल्या तर त्यांचे जीवन अतिशय साधे आणि आनंदी होऊ शकते. गरुड पुराण हा असा ग्रंथ आहे, जो माणसाच्या जीवनाच्या अंताचे रहस्य सांगतो.
मुंबई : गरुड पुराण (Garud Puran) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. ज्यामध्ये ज्ञान, विज्ञान, धोरण, नियम, धर्म इत्यादींशी संबंधित अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत पण लोक त्याला फक्त स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, मृत्यू, पुनर्जन्म, यमलोक इत्यादींशी संबंधित ग्रंथ मानतात. याविषयी लोकांच्या मनात अशीही धारणा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ते एकावे पण तसे अजिबात नाही. जर लोकांनी गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणल्या तर त्यांचे जीवन अतिशय साधे आणि आनंदी होऊ शकते. गरुड पुराण हा असा ग्रंथ आहे, जो माणसाच्या जीवनाच्या अंताचे रहस्य सांगतो आणि आजचे धावपळीचे जीवन सोप्या पद्धतीने जगण्याचा मार्गही दाखवतो. त्यामुळे तुम्हालाही तुमचे जीवन तणावमुक्त, आनंदी आणि यशस्वी बनवायचे असेल तर गरुड पुराणातील या गोष्टी लक्षात ठेवा-
स्वच्छ आणि सुगंधी कपडे घाला
जर तुम्हाला तुमचे जीवन यशस्वी आणि आनंदी बनवायचे असेल आणि प्रगतीची प्रत्येक पायरी चढायची असेल, तर गरुड पुराणात सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे स्वतःला नेहमी स्वच्छ ठेवा. नेहमी स्वच्छ आणि सुगंधी कपडे घाला. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती घाणेरडे, मळकट आणि दुर्गंधीयुक्त कपडे परिधान करतो त्याला नशिब साथ देत नाही आणि अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपाही नसते.
दररोज आंघोळ करा
गरुड पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीने रोज स्नान करावे. यामुळे तुमच्यातील नकारात्मकता संपते आणि व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मकता येते. यासोबतच रोज स्नान करणाऱ्यांवर माता लक्ष्मीही प्रसन्न होते. म्हणूनच रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवा.
तुळशीच्या रोपाचे महत्व
शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्व दिले आहे. याशिवाय गरुड पुराणातही तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हिरवे असते, तेथे सदैव समृद्धी असते आणि रोग आणि दोष देखील घरांपासून दूर राहतात. त्यामुळे शक्य असल्यास घरात तुळशीचे रोप लावा आणि त्याची रोज काळजी घ्या. तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)