Garuda Purana | जीवन कष्टमुक्त करण्यासाठी गरुड पुराणातील ‘या’ गोष्टी करतील मदत, सात पिढ्यांचे होईल कल्याण
जीवनात सुख आणि दु: ख नेहमीच येत राहते, परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीस अनेक आडचणी येतात. धार्मिक शास्त्रानुसार त्याचे स्वतःचे कर्म देखील असते. चांगली कर्मे एखाद्या व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी काम करतात आणि वाईट कर्मे दुःख आणि समस्यांचे कारण बनतात.
मुंबई : जीवनात सुख आणि दु: ख नेहमीच येत राहते, परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीस अनेक आडचणी येतात. धार्मिक शास्त्रानुसार त्याचे स्वतःचे कर्म देखील असते. चांगली कर्मे एखाद्या व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी काम करतात आणि वाईट कर्मे दुःख आणि समस्यांचे कारण बनतात. गरुड पुराणात व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे मिळणाऱ्या फळांचाही उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या कर्माचा परिणाम त्याच्या जीवनात तो जिवंत असताना, मृत्यूनंतर आणि दुसरा जन्म होईपर्यंत राहतो. परंतू करूड पुराणामध्ये जीवन कष्टमुक्त करण्यासाठी काही पर्यायसुद्धा सांगितले आहेत. ते पर्याय पुढील प्रमाणे आहेत. या गोष्टीमच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्रास कमी करू शकता.
दिवसातून पाच भुकेल्या जीवांना अन्नदान करणे
गरुड पुराणात कष्टमुक्त करण्यासाठी काही पर्याय दिले आहेत त्यामध्ये अन्न दान करणे हा पर्याय आहे, अन्नदान करताना पहिली चपाती गाईला आणि शेवटची रोटी कुत्र्याला द्यावी असे सांगितले आहे. याशिवाय पक्ष्यांना खाऊ घाला आणि मुंग्यांना साखर आणि पीठ द्या. आजूबाजूला मासे असतील तर त्यांना पिठाच्या गोळ्या खायला द्या. जर तुम्ही सर्वांना खाऊ घालू शकत नसाल तर किमान दररोज कोणाला तरी अन्न द्या असा पर्याय सांगितला आहे.
अन्न दान करा
अन्नदान हे महान दान मानले जाते. गरीब आणि गरजूंना अन्नदान केल्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्यच नाही तर त्याच्या 7 पिढ्यांचे आयुष्य वाढते. यासह, कुटुंबातील सर्व दोष नष्ट होतात.
ध्यान करा
आपले विचार शुद्ध करण्यासाठी आणि स्वतःला देवाशी जोडण्यासाठी नियमितपणे ध्यान करा आणि कुटुंबात आनंद आणि शांती टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने पैसे कमवा.
कुलदैवतेचे पूजन
प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत असते. त्यांना कधीही विसरू नका. कुलदैवतच्या आशीर्वादाने कुटुंबाच्या सात पिढ्या भरभराटीला येतात. याशिवाय, तुमच्या पितरांचा आदर करा. पितरांचे श्रद्धा त्यासंबधी पूजा अर्चना करा.
देवाला दान करा
तुम्हाला जगात जे काही मिळाले ते देवाने तुम्हाला दिले आहे. त्याचे आभार मानण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्हाला जे काही मिळेल ते आधी परमेश्वराला अर्पण करा. घरी नियमितपणे तयार केलेले अन्न देखील चव न घेता देवाला अर्पण केले पाहिजे. असे केल्याने लक्ष्मी आणि नारायण यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात आणि कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसाधारण हित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)
इतर बातम्या :
Tulja Bhavani Devi | दुर्गाअष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा
Health Tips : ‘या’ 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!https://t.co/8c1fwMl69X | #HealthTips | #Ayurvedicherbs | #Health | #food | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021