Garud Puran : मृत्यूनंतर का आवश्यक असते तेरवी, गरूड पूराणात दिले आहे कारण
तेराव्यानंतरच मृत व्यक्तीच्या आत्म्याला भगवंताच्या निवासस्थानी स्थान मिळते, अशी श्रद्धा आहे. यामध्ये गरूड पूराणात माहिती देण्यात आली आहे. गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर 13 दिवस घरात राहतो
मुंबई : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मृत्यूनंतर 13 दिवस शोक पाळला जातो. तेरा दिवसांचा हा काळ तेरवी म्हणून ओळखला जातो. तेराव्या दिवशी (Tervi After Death) ब्राह्मणाला भोदनदान केल्याने मृताच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. तेराव्यानंतरच मृत व्यक्तीच्या आत्म्याला भगवंताच्या निवासस्थानी स्थान मिळते, अशी श्रद्धा आहे. यामध्ये गरूड पूराणात माहिती देण्यात आली आहे. गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर 13 दिवस घरात राहतो. गरुड पुराणात (Garud Puran) असेही म्हटले आहे की, जर मृत व्यक्तीचे तेराव्याचे पालन केले नाही तर त्याचा आत्मा पिशाच योनीत भटकत राहतो, अशीही एक मान्यता आहे.
तेराव्या दिवशी होते पिंडदान
13 दिवसांपर्यंत मृत व्यक्तीच्या संस्कारांशी संबंधित सर्व आवश्यक विधी केले जातात. असे मानले जाते की आत्मा आपल्या कुटुंबातील सदस्यांनी केलेले कार्य काळजीपूर्वक पाहतो. 13 व्या दिवशी ब्राह्मणाला भोजन दान आणि आत्म्याच्या निवृत्ती पित्यर्थ पिंडदान केले जाते. पिंडदान केल्याने आत्म्याला शक्ती मिळते आणि मृत्यूलोक ते यमलोक हा प्रवास पूर्ण होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
ब्राह्मण भोजनाला देखील आहे आहे
तेराव्याला ब्राह्मण पर्व देखील खूप महत्वाचे मानले जाते कारण सर्व विधी ब्राह्मण करतात. अशा परिस्थितीत जर ब्राह्मण भोजन आयोजित केली नाही तर मृत व्यक्तीचा आत्मा ब्राह्मणांचा ऋणी होतो. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला यातून मोक्ष मिळत नाही आणि त्याला त्रास सहन करावा लागतो.
तसेच वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या
तेरावा करण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. विज्ञानामध्ये असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती 13 दिवसांपेक्षा जास्त काळ उदासीन राहिली तर त्याला नैराश्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच कुटूंबीयांमध्ये नैराश्य टाळण्यासाठी तेराव्या दिवशी केलेला कार्यक्रम महत्त्वाची भूमीका बजावतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)