Gatari Amavasya 2022: आज गटारी अमावस्या, गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान का करतात?

गटारी अमावस्येनंतर श्रावण सुरू होते. त्यानंतर लोकं मांसाहार, मादक पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात.

Gatari Amavasya 2022: आज गटारी अमावस्या, गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान का करतात?
गटारी अमावस्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:40 AM

मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिन्यात पुढील 40 दिवस मद्यपान व मांसाहार वर्ज्य केला जातो. पंचांगानुसार मराठी महिन्यात आषाढी अमावस्या  हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक जण  मांसाहार आणि मद्यपान करतात. त्यामुळे याला गटारी अमावस्या (Gatari Amavashya) म्हणतात  यावेळी गटारी अमावस्या 28 जुलै म्हणजे आज आहे. उद्यापासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना 15 दिवस आधीच सुरु होतो. मराठी लिकांचा श्रावण महिना 29 जुलै म्हणजेच उद्या पासून सुरु होईल. श्रावण महिन्यात महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.  श्रावण महिन्यात सात्विक आहाराला प्राधान्य देण्यात येते. श्रावणात मांस व मद्य सोडून सात्विक आहार घेतो. तर उत्तर भारतात ती हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते.

गटारी अमावस्येनंतर श्रावण सुरू होते. त्यानंतर लोकं मांसाहार, मादक पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात. हा दिवस अनेकजण गटारी म्हणून साजरा करतात. तर याच दिवशी दीप आमावस्या देखील आहे. संध्याकाळी दिव्याचे पूजन करून घराच्या अवती भवती दिवे लावून अनेक जण दीप अमावस्या साजरी करतात.

हे सुद्धा वाचा

गटारी अमावस्या साजरी करण्यामागील कारण

गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे कारण म्हणजे  श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो, कारण हा महिना पावसाळ्यात येतो. त्यामुळे या महिन्यात  हलके अन्न खाणे आरोग्यदायी असते. गटारी सणाच्या दिवशी, काही जण दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवानीचा आनंद घेण्यासाठी आणि मद्यपान करण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. श्रावण सुरू  झाल्यानंतर पूजापाठ करतात.

दीप अमावस्या देखील करतात साजरी

चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या म्हणतात.  श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.