Weekly Horoscope, 8 ते 14 मे 2022: कायद्याच्या कचाट्यात फसू शकतात मिथुन राशीचे लोक, बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा जाणून घ्या

Weekly Horoscope, 8 ते 14 मे 2022: मकर राशीच्या लोकांना व्यावसायिक कामात काही अडीअडचणींचा सामना करावा लागेल. पण, काळजी करू नका. हळू-हळू सर्व ठीक होत जाईल. प्रोडक्शन बरोबर मार्केटिंग संबंधी कामकाजात पण लक्ष देणं गरजेचं आहे.

Weekly Horoscope, 8 ते 14 मे 2022: कायद्याच्या कचाट्यात फसू शकतात मिथुन राशीचे लोक, बाकी राशीच्या लोकांना कसा असेल हा आठवडा जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:48 PM

डॉ. अजय भाम्बी –Weekly Horoscope 08 May 2022 to 14 May 2022| येणारा आठवडा (Week) कसा असेल. या आठवड्यात कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन आपला वेळ शुभ (Lucky)असेल. याशिवाय, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तोटा टाळू शकता. यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. या आठवड्यात आपल्यासाठी कोणता रंग (Colour), कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर शुभ आहे, हे देखील जाणून घेऊ. जाणून घ्या या आठवड्याचं म्हणजेच 08 एप्रिल ते 14 मेपर्यंतचं संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य ( Weekly Horoscope Of All Zodiac Signs Rashifal From 08 May 2022 to 14 April 2022)

मेष (Aries):

कोणतेही काम करण्याआधी त्याची पूर्व तयारी करा. असं केल्याने कामात चुका होणार नाहीत. कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी योजना आखल्या जातील. त्या यशस्वी देखील होतील. मुलांच्या भावना समजून घेऊन, त्यांच्या कामात त्यांना पाठिंबा द्या. इतरांना तुमच्या व्यक्तिगत कामात हस्तक्षेत करून देऊ नका. नाहीतर त्याने तुमची कामं अडू शकतात. काही जुने मुद्दा पुन्हा उपस्थिती होवू शकतात. ज्याचा नकारात्मक परिणाम संबंधावर पडेल. थोडं सर्व गोष्टींना समजून घ्या. याआठवड्यात व्यवसायिक कामकाज सामान्य राहिल. निष्काळजीपणामुळे कामे बिघडू शकतात. नोकरदारवर्गातील लोकांना ही वेळ नवी संधी मिळवून देणारी आहे.

वृषभ राश‍ी (Taurus)-

काही विक्षिप्त परिस्थिती समोर येईल. पण, यापरिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. स्थलांतराजी योजना आखली जात असेल तर गांभीर्याने विचार करा.काळ अनुकूल आहे. महत्वाच्या मुद्द्यावर असमंजस स्थितीत जवळच्या लोकांशी सल्ला मसलत करा. निकिच तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. वैयक्तिक कामात इतके व्यस्त असाल की नातेवाईकांना वेळ देता येणार नाही. ज्यांने नातेवाईक नाराज होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी आळशीपणा करून कामं उद्यावर ठकलू नका. कामं वेळेवर पूर्ण करा. नियोजनबद्ध काम लाभदायक ठरू शकते.

मिथुन राश‍ी (Gemini)-

काळ आव्हानात्मक आहे. पण, तुम्ही तुमच्या प्रतिभाकौशल्याने आणि कार्यक्षमतेने कोणत्याही परिस्थितीचा सामना कराल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या यशाचे दार उघडेल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. स्वत:च्या प्रगतीसाठी स्वभावता थोडा स्वार्थ आणणं गरजेचं आहे. काही जवळेच लोक तुमच्या कामात अडथळे आणतील विरोध करतील. कोणच्याही गोड बोलण्याला भुलू नका. कायद्याच्या तसंच सरकारी कामात निष्काळजीपणा करू नका. परिवाराच्या आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांत ताळमेळ बसवणं आव्हान असेल. राजकीय क्षेत्रातील लोकांशी व्यवहार करताना सावधानी बाळगा. मानहानी होण्याची शक्यता.

कर्क राश‍ी (Cancer)-

नवीन माहिती मिळेल. प्रयत्न केल्यास मनातील कामं अपेक्षे प्रमाणे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही नोकरी संबंधीत परिक्षेत यश मिळेल. राजकीय कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतील. पण, तुमच्या बजेटची काळजी घ्या. व्यर्थ गोष्टींत वेळ वाया घालवू नका. व्यवसाया संबंधीत घेतलेल्या निर्णयात सुरुवातीला त्रास होईल. अपेक्षित लाभ मिळणार नाही. पण, हळू – हळू परिस्थिती अनुकूल होत जाईल. इनकम टॅक्स, सेल्स टॅक्स संबंधित काहीतर झंझट निर्माण होऊ शकते.

सिंह राश‍ी (Leo)-

ग्रहमान परिवर्तनशील राहिल. कोणतेही काम करण्याआधी त्याचे पूर्ण नियोजन करणं फायदेशीर ठरेल. ज्यात लाभ तर मिळेलच त्याचबरोबर ऊत्साहपूर्ण वातावरण राहिल. महिलातवर्गासाठी हा वेळ अति अनुकूल आहे. प्रॉपर्टी संबंधित काही वाद सुरू असतील तर सावधानी बाळगा. त्रास वाढू शकतो. यावेळी स्वभावात धैर्य आणि संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. तुमच्या अति शिस्तपूर्ण वागण्याचे कुटूंबाला त्रास होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांसाठी ऑफिसमध्ये शुभ परिस्थिती असेल. बॉस तसंच उच्चअधिकाऱ्यांसोबत संबंध खराब होवू देऊ नका.

कन्या राश‍ी (Virgo)-

याआठवड्या ग्रह स्थिती अनुकूल आहे. दैनंदिन कामातूल खूप थकत असाल तर आध्यात्मिक गोष्टीत वेळ घालवणं चांगलं. त्याने जीवनात नवं पण येईल. घरातील मोठ्या लोकांविषयी आदरबाळगा. त्यांचं मार्गदर्शन घ्या. भविष्यातील योजना बनवताना दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या निर्णयाला प्राधान्य द्या. मैत्री तील एखादी व्यक्ती किंवा नातेवाईकांनी दिलेला शब्द पाळला नाहीतर तुम्हाला वाईट वाटू शकते. पण, अशावेळी रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायात जनसंपर्क वाढवा. मीडिया संबंधीत क्षेत्रात विशेष लक्ष द्या. नोकदार वर्गातील व्यक्तींचा महत्वपूर्ण प्रोजक्ट पूर्ण झाल्याने कंपनीला फायदा होईल.

तूळ राश‍ी (Libra)-

मेहनत आणि संघर्षाची वेळ आहे. तुमचं ध्येय गाठण्यासाठी आधिक परिश्रम करावे लागेल. मेहनतीप्रमाणे योग्य फळ देखील मिळेल. कुटंबासोबत बाहेर जाण्याचा योग. तरूण वर्गातील मुलांना करिअर संबंधी शुभ सूचना मिळतील. खर्चामुळे घरातील बजेट बिघडू शकते. आळशीपणा मुळे कामं टाळू नका. वेळेनुसार केलेल्या कामाचां चांगला परिणाम मिळेल. घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्य संदर्भात काळजीपूर्ण वातावरण राहिल. अशावेळी लोकांच्या कामात पडू नका. व्यवसायात बदल करण्यासाठी काही योचना आखल्या आहेत, त्या पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी कोणत्याही अनैतिक कार्यात पडू नये.

वृश्चिक राश‍ी (Scorpio)-

तुमची दडपलेली प्रतिमा लोकांच्या समोर येईल. आत्मविश्वास वाढेल. तसंच महत्वाची माध्यमं आणि मार्केटिंग संबंधिक माहिती मिळविण्यासाठी वेळ द्या. जीवनशैलीत आणि दिनक्रमात बद्दल करणं आवश्यक आहे. जवळच्या लोकांशी वाद – विवाद होण्याची शक्यता. व्यर्थ गोष्टीत पडूच नका. मुलांच्या समस्या सोडवणं तुमची जबाबदारी असेल. तरूणांना ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पण, घाबरू नका, सफल नक्की व्हाल. व्यवसाया संबंधित नवे निर्णय घ्याल. प्रमाणिकपणे तुमचे काम करत रहा. योग्य लाभ नक्की मिळेल. आठवड्याच्या सुरूवातीला सरकारी त्रास होऊ शकतो. टॅक्स आणि लोन संबंधीत फाईल्स पेपर व्यवस्थित ठेवणं आवश्यक. नोकदरा लोकांनी आपल्या कामावर पूर्णपणे फोकस असणं गरजेचं आहे.

धनु राश‍ी (Sagittarius)-

यशाचे दार उघडणार आहे. शुभ प्रसंगाचे उत्साहाने आणि आदराने स्वागत करा. घरात पाहुण्यांची रेलचेल राहिल. काही समस्याही सामंजस्याने सोडवल्या जातील. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. कोणतीही कायदेशीर अडचण येत असेल तर अजिबात दूर्लक्ष करू नका. तसंच योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. सामाजिक क्षेत्रात तुमची असलेली लोकप्रियता कायम राहिल. कामामुळे प्रवासाचा योग. कोणतीही नवी गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती आवश्यक घ्या.

मकर राश‍ी (Capricorn)-

तुमच्या व्यवहार कौशल्यामुळे अनेक कामं व्यवस्थित सोडवू शकाल. मनोरंजनपर कामातही थोडा वेळ घालवा. विद्यार्थी त्यांच्या अभ्यास आणि करिअरबाबत जागरूक राहतील. कोणतंही काम करताना विचारपूर्वक भाषा वापरा नाहीतर, लहान गोष्टींवरून विवाद होण्याची शक्यता. राजकीय तसंच सामाजिक कार्यापासून सध्या दूर राहणं योग्य. कोणतीही समस्या आली की टेंशन घेण्यापेक्षा समजस्यांने सोडविण्याचा प्रयत्न करा.

कुंभ राश‍ी (Aquarius)-

तुम्ही गेल्या काळापासून तुमच्या मेहनतीने परिस्थिती बऱ्याच प्रमाणात अनुकूल केली आहे. आता निश्चिंत राहा. तुम्हाला यामेहनतीचे योग्य फळ मिळेल. याप्रसंगी दैनंदिन कामात भावनांना महत्व देण्यापेक्षा प्रॉक्टीकल राहून आपली कामे पार पाडा. कोणत्याही कामात राग आणि घाई करू नका. झटपट यशस्वी होण्यासाठी कोणतेही गैरमार्ग वापरू नका. त्याने मानहानीचा सामना करावा लागू शकतो. लोकांच्या बोलण्याला फसू नका. तुमच्या व्यवसायात नवे प्रयोग राबवत असाल तर तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. यंदा उत्पादनाबरोबरच विपणनावरही लक्ष केंद्रीत करा. तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. मशिनरी, फॅक्टरी अशा संबंधीत व्यवसायात चांगली परिस्थिती निर्माण होत आहे.

मीन राश‍ी (Pisces) –

घरात धार्मिक कार्य संबंधी प्रोग्रमा होण्याचे नियोजन होईल त्याने वातावरण सकारात्मक राहिल. महिलावर्गासाठी ही वेळ फलदायी आहे. त्यांची कार्यक्षमता आणि प्रतिभा नवा मुक्काम गाठण्यासाठी सक्षम राहिल. जवळच्या नातेवाईकांबरोबर भावनात्मक नाती मजबूत होतील. मुलांवर जास्त संयम ठेवल्याने ती जास्त हट्टी होतील. एखाद्या व्यक्तीशी निरुपयोगी वादात अजिबात पडू नका. त्याने तुमचे स्वत:चे नुकसान होवू शकते. तुमच्या शारिरीक क्षमतेनुसार काम करा. जास्त काम केल्याने आरेग्यावर परिणाम होईल. कमं वाटून घ्या. व्यवसायात कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवा. त्यांच्या राजकराण चालू शकते. नोकरीत स्वत:च्या कामाल पूर्णपणे सजग राहणं गरजेचं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.