AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyotish tips: रोज ‘या’ गोष्टी करण्याची सवय लावा, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही!

धनप्राप्तीसाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब करून (Jyotish upay for money) जीवनात सतत येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करता येते. तुम्ही देखील हे उपाय अवलंबू शकता. जाणून घ्या या उपायांबद्दाल...

Jyotish tips: रोज 'या' गोष्टी करण्याची सवय लावा, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही!
धनप्राप्तीसाठी हे उपाय करा
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:57 PM

सहसा प्रत्येकजण आनंदी, सुखी (Happiness) आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी प्रयत्न करतच असतो. पैसे (Jyotish tips for money benefits ) जीवन सुरळीत चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. लोक ते मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात. कठोर परिश्रम आणि समर्पण पैसे मिळविण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते, परंतु काहीवेळा नेमकं उलट देखील घडतं. बघायला गेलं तर लाखो प्रयत्नांनंतरही लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना ( wealth problems ) करावा लागतो. बहुतेकवेळा, लोक पैसे कमवतात आणि त्यांच्याकडे येतात ही किंवा पैसे मिळतात, पण ते हातात टिकत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण वास्तू किंवा इतर दोषही कोणावर तरी परिणाम करू शकतात. लोकांनाही नेमकं लक्षात येत नाही की अडचण कुठे आहे?

तसं, धनप्राप्तीसाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास जीवनात सतत येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करता येते. तसेच, खर्चासोबत सेव्हिंग ही करू शकता, जाणून घ्या या उपायांबद्दल…

शिवलिंगाला जलाभिषेक

असे मानले जाते की भगवान शंकराला प्रसन्न करणं सोपं नाही, परंतु जर शंकर देव तुमच्यावर प्रसन्न झाले तर धन आणि इतर त्रास दूर होतात. भगवान शिव शंकराला प्रसन्न करून धनसंपत्ती मिळवायची असेल तर दररोज शिवलिंगाला जलाभिषेक करा. यासोबतच शंकराला अत्यंत प्रिय असणारी बेलची पाने ही अर्पण करावी. दूधही भगवान शंकराला अर्पण करावे.

हे सुद्धा वाचा

मंदिरात दिवा लावा

जर तुम्ही देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची खऱ्या भक्ती भावाने पूजा केली तर पैशाची समस्या तुमच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी देखील म्हटलं जातं आणि धनप्राप्तीसाठी तुम्ही तिच्यासमोर दिवा लावू शकता. आपल्या घरातील मंदिरात लक्ष्मी आणि श्रीगणेशाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

गुरुवारी उपवास करा

धनाची देवता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही उपवास देखील करू शकता. शास्त्रानुसार गुरुवारचा उपवास केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. हा दिवस भगवान विष्णूलाही समर्पित आहे आणि त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू देवाच्या पूजेने तुम्ही देवी लक्ष्मीलाही प्रसन्न करू शकता आणि विष्णू देवालाही.

घराची नियमीत स्वच्छता

असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, तेथे माता लक्ष्मीचा वास करत नाही. अशा घरांतील सदस्यांवर माता लक्ष्मीचा कोप होतो. जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि हे काम रोज करण्याची सवय लावा. याचा एक फायदा असा आहे की तुम्ही निरोगीही राहू शकाल.

बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.