Good Friday | गुड फ्रायडे म्हणजे काय जाणून घ्या या मागील कथा
ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले (Good Friday) जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात.
मुंबई : ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले (Good Friday) जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. अशी मान्यता आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्यांनी आत्मत्याग करुन लोकांना प्रेमाच्या एक उदाहरण सादर केले. या दिवसाला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 15 एप्रिलला (15 April) साजरा केला जात आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर (Yeshu) जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही. मग या दिवसाला गुड फ्रायडे का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ याबाबतची अधिक माहिती
काय आहे मान्यता?
ख्रिश्चन समाजाच्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं. जेव्हा येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूयांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. येशू यांनी प्रेमाच्या उदाहरण सादर करण्यासाठी आपली कुर्बानी दिली. ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. येशू यांनी महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हटलं जाऊ लागलं
गुड फ्रायडे कसा साजरा करता?
गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात. ख्रिश्चन समाजाचे लोक सकाळच्या प्रार्थनेत सहभागी होतात. या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या क्षणांचे आणि बलिदानाचे स्मरण केले जाते. येशू ख्रिस्ताची शिकवण वाचली जाते. त्यांनी सांगितलेले संदेश आणि शिकवण स्वतःच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
ईस्टर संडे म्हणजे काय?
मान्यतेनुसार, क्रॉसवर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवला. येशूच्या पुनःजीवित जाल्याने या दिवसाला ईस्टर संडे म्हटलं जातं. या दिवसापासून ते 40 दिवसांपर्यंत ईस्टर साजरा केला जातो. या संदर्भात एक चित्र सुद्ध प्रसिद्ध आहे त्याला ‘लास्ट सपर’ असे म्हणतात.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ