Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये देवीची याप्रकारे पूजा करा, व्यापार रातोरात वाढेल
माघ शुक्ल पक्ष आणि आषाढ शुक्ल पक्षात शक्ती साधनेच्या गुप्त नवरात्रीचा महापर्व वर्षातून दोनदा येतो. अशा प्रकारे नवरात्रोत्सवात शक्तीचे भक्त वर्षातून चार वेळा देवी भगवतीची पूजा करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या चार नवरात्र ऋतू बदलाच्या वेळी साजरी केली जातात
मुंबई : माघ शुक्ल पक्ष आणि आषाढ शुक्ल पक्षात शक्ती साधनेच्या गुप्त नवरात्रीचा महापर्व वर्षातून दोनदा येतो. अशा प्रकारे नवरात्रोत्सवात शक्तीचे भक्त वर्षातून चार वेळा देवी भगवतीची पूजा करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या चार नवरात्र ऋतू बदलाच्या वेळी साजरी केली जातात (Gupt navratri 2021 how to worship goddess for growth in business).
नवरात्रीच्या महात्म्याचे वर्णन आपल्या सर्व धार्मिक ग्रंथात सापडते. नवरात्रातील नऊ दिवस सर्व प्रकारच्या सिद्धी आणि आनंद प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानले जातात. यामुळेच नवरात्रात शक्तीचे उपासक पूर्ण भक्तिभावाने आणि विश्वासाने आई जगदंबेची साधना, पूजा इत्यादी करतात.
सामान्य नवरात्र आणि गुप्त नवरात्रात फरक काय?
देवी भगवतीला अर्पण असलेल्या सामान्य नवरात्रात सात्विक आणि तांत्रिक उपासना सामान्यपणे केली जाते. पण गुप्त नवरात्रात विशेषत: तांत्रिक उपासना करण्याची परंपरा आहे. गुप्त नवरात्री दरम्यान साधनेला नेहमीच गुप्त ठेवले जाते. मान्यता आहे की गुप्त नवरात्रात साधना आणि मनोकामना जितक्या अधिक गुप्त ठेवल्या जातात तितकाच साधकाला देवीकडून यश आणि आशीर्वाद मिळतो.
व्यवसाय वाढविण्यासाठी हे महाउपाय करा –
? व्यवसायाच्या वाढीसाठी, गुप्त नवरात्रात आई जगदंबेची विशेष साधना आणि विधी केले जातात.
? नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात सकाळी व्यापार वाढीसाठी आपण साधना करू शकता. देवीच्या पूजेसाठी आंघोळ करुन ध्यान करुन शुद्ध पांढरे कपडे घालून गुलाबी रंगाचा स्कार्फ किंवा दुपट्टा घालून पूर्वेकडे तोंड करुन बसावे.
? बसण्यासाठी लोकरीच्या आसानचा वापर करा. देवीच्या पूजेसाठी देवी श्री तारादेवी किंवा भगवती दुर्गा यांचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवा.
? यानंतर पांढरा कपडा पसरवा आणि त्यावर एक प्लेट ठेवा आणि त्यामध्ये कुंकवाने श्री तारा लिहा. त्यानंतर त्यात अक्षत घाला.
? यानंतर अक्षताचा ढीग थाळीत ठेवून त्यावर विधीवतपणे पूजा करुन श्री तारा महाविद्या यंत्र स्थापित करा.
? या यंत्राच्या पूजेमध्ये लक्ष्मीजींच्या प्रिय कौडींचा वापर नक्की करा.
? यानंतर व्यवसायात यशस्वी होण्याची मनोकोमना प्रकट करत देवीला फुले अर्पण करा आणि धूप-दीप दाखविल्यानंतर, “ऐं ओं क्रीं क्रीं हूं फट्” या मंत्राचा 21 वेळा जप करावा.
? पूजा पूर्ण झाल्यावर सर्वांमध्ये प्रसाद वाटून घ्या आणि पूजा सामग्री इत्यादी पवित्र स्थानी पुरुन द्या.
Gupt Navratri 2021 | मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुप्त नवरात्रात करा शक्तीची साधनाhttps://t.co/4HqFEwzAvG#AshadhaMonth #GuptNavratri2021 #Navratri
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2021
Gupt navratri 2021 how to worship goddess for growth in business
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
एक मंदिर असं जिथे चपलांची माळ अर्पण करुन नवस मागतात, जाणून घ्या या मंदिराबाबत